'धुरंधर'च्या सेटवर कोणाशीच बोलायचा नाही अक्षय खन्ना, एका कोपऱ्यात बसून राहायचा...; अभिनेत्याचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 11:52 IST2026-04-09T11:51:40+5:302026-04-09T11:52:26+5:30

'धुरंधर'मध्ये रहमान डकैतची भूमिका साकारण्यासाठी अक्षय खन्नाने स्वत: ला काही नियम घालून घेतले होते. 'धुरंधर'मध्ये उजैर बलोचची भूमिका साकारलेल्या दानिश पंडोरने याबाबत खुलासा केला. 

Akshaye Khanna doesn't want to talk to anyone on the sets of 'Dhurandhar', follows a no-phone policy, reveals actor danish pandor | 'धुरंधर'च्या सेटवर कोणाशीच बोलायचा नाही अक्षय खन्ना, एका कोपऱ्यात बसून राहायचा...; अभिनेत्याचा खुलासा

'धुरंधर'च्या सेटवर कोणाशीच बोलायचा नाही अक्षय खन्ना, एका कोपऱ्यात बसून राहायचा...; अभिनेत्याचा खुलासा

सध्या 'धुरंधर २'ची सर्वत्र क्रेझ आहे. मात्र 'धुरंधर' गाजवलेल्या अक्षय खन्नाला लोक विसरू शकलेले नाहीत. 'धुरंधर'मध्ये रहमान डकैतची भूमिका साकारून अक्षय खन्नाने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली होती. सिनेमा रिलीज झाल्यानंतर त्याच्या भूमिकेचं कौतुक झालं होतं. पण, ही भूमिका साकारण्यासाठी अक्षय खन्नाने स्वत: ला काही नियम घालून घेतले होते. 'धुरंधर'मध्ये उजैर बलोचची भूमिका साकारलेल्या दानिश पंडोरने याबाबत खुलासा केला. 

अक्षय खन्नाबद्दल न्यूज १८ला दिलेल्या मुलाखतीत दानिश म्हणाला, "ते माणूस म्हणून खूप चांगले आहेत. सगळ्यांना ते खूप छान वागणूक देतात. ते जास्त कुणाशी बोलत नाहीत हे खरं आहे. मात्र तुम्ही त्यांना काही विचारलं तर ते नक्कीच तुमच्याशी संवाद साधतात. मला तुझ्याशी बोलायचं नाही असं ते कधी म्हणत नाहीत. ते खूप कमाल माणूस आहेत. मात्र जेव्हा ते सिनेमाच्या सेटवर असतात तेव्हा मात्र त्यांच्या झोनमध्ये असतात. ते नेहमीच त्यांच्या भूमिकेवर आणि कामावर लक्ष केंद्रित करतात. जेव्हा ते कॅमेऱ्यासमोर येतात तेव्हा ते त्यांच्या कॅरेक्टरमध्ये असतात".

"अक्षय खन्ना सेटवर त्यांचा फोन वापरत नाहीत. सेटवर त्यांची नो फोन पॉलिसी असते. ते एका कोपऱ्यात बसून असतात. जोपर्यंत त्यांच्याशी कोणी बोलायला जात नाही. तोपर्यंत ते कोणाशीच काहीच बोलत नाहीत. ते शांत बसून असतात. ते फक्त त्यांच्या भूमिकेबाबात विचार करत असतात", असंही दानिशने सांगितलं. 

Web Title : 'धुरंधर' सेट पर अक्षय खन्ना चुप रहते थे, सह-कलाकार का खुलासा

Web Summary : 'धुरंधर' के सेट पर अक्षय खन्ना दूरी बनाए रखते थे, सिर्फ अपने किरदार पर ध्यान देते थे। सह-कलाकार दानिश पंडोर ने खन्ना के समर्पण का खुलासा करते हुए कहा कि उन्होंने फोन का इस्तेमाल नहीं किया और चरित्र में बने रहे, जब तक उनसे संपर्क नहीं किया गया, तब तक शायद ही कभी सामाजिकता की।

Web Title : Akshay Khanna: Silent on 'Dhurandhar' set, reveals co-star.

Web Summary : Akshay Khanna maintained distance on 'Dhurandhar' set, focusing solely on his role. Co-star Danish Pandor revealed Khanna's dedication, stating he avoided phone use and remained in character, rarely socializing until approached.