"मी अक्षय खन्नाला अभिनय शिकवला", 'या' अभिनेत्यानं केला दावा, नेमकं काय बोलला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 09:49 IST2026-03-12T09:48:45+5:302026-03-12T09:49:25+5:30

'रहमान डकैत'ला कुणी दिले अभिनयाचे धडे?

Akshaye Khanna Anup Soni Acting Student Dhurandhar The Revenge Rehman Dacoit | "मी अक्षय खन्नाला अभिनय शिकवला", 'या' अभिनेत्यानं केला दावा, नेमकं काय बोलला?

"मी अक्षय खन्नाला अभिनय शिकवला", 'या' अभिनेत्यानं केला दावा, नेमकं काय बोलला?

Akshaye Khanna : 'धुरंधर'मधील 'रहमान डकैत' या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता अक्षय खन्ना सध्या चर्चेत आहे. अशातच 'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेते अनुप सोनीनं अक्षयबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. अक्षय खन्ना हा आपला विद्यार्थी होता आणि आपण त्याला अभिनयाचे धडे दिले आहेत, असा दावा अनुप सोनीनं  केला आहे.

एका मुलाखतीत अनुप सोनीनं अक्षयच्या स्ट्रगल आणि यशाबद्दल भाष्य केले. तो म्हणाला, "मी अक्षयसोबत अनेक अभिनय वर्ग घेतले आहेत. मी त्याला अभिनय शिकवला आहे. त्याचा आजचा हा यशस्वी प्रवास पाहून मला मनापासून आनंद होतोय. अक्षयची विचारसरणी नेहमीच स्पष्ट होती आणि मी नेहमीच त्याचे कौतुक केले आहे".

अनुप सोनी पुढे म्हणाला की, "अक्षय आता अशा टप्प्यावर पोहोचला आहे, जिथे तो चित्रपट निर्मात्यांसाठी अत्यंत विश्वासार्ह अभिनेता बनला आहे. कोणत्याही भूमिकेत तो चपखल बसतो आणि हीच एका चांगल्या अभिनेत्याची ओळख आहे. त्याने सुरुवातीला लहान आणि मध्यवर्ती भूमिकांमधून अनुभव घेतला आणि आता तो जे काम करतोय ते खरोखरच आश्चर्यकारक आहे".

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर: द रिव्हेंज' हा चित्रपट १९ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.  पण, अक्षय खन्ना 'धुरंधर २' या चित्रपटात दिसणार की नाही? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय खन्ना या वेळी पहिल्या भागाप्रमाणे मुख्य खलनायकाच्या भूमिकेत नसेल, तरीही चित्रपटातील काही महत्त्वाच्या 'फ्लॅशबॅक' दृश्यांमध्ये त्याने साकारलेल्या रहमान डकैतची झलक पाहायला मिळणार आहे.याशिवाय, २०२६ मध्ये अक्षय खन्ना सनी देओलसोबत नेटफ्लिक्सच्या 'इक्का' चित्रपटात आणि दक्षिण भारतीय चित्रपट 'महाकाली' मध्ये देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: Akshaye Khanna Anup Soni Acting Student Dhurandhar The Revenge Rehman Dacoit