पुन्हा मिस्ट्री गर्लसोबत चेहरा लपविताना दिसला अक्षयकुमारचा मुलगा आरव, पहा फोटो !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 14:30 IST2017-10-05T09:00:07+5:302017-10-05T14:30:29+5:30
बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमारचा मुलगा सध्या भलताच चर्चेत आहे. तुम्ही म्हणाल की तो बॉलिवूडमध्ये येण्याची तयारी करीत आहे काय? तर ...

पुन्हा मिस्ट्री गर्लसोबत चेहरा लपविताना दिसला अक्षयकुमारचा मुलगा आरव, पहा फोटो !
ब लिवूडचा खिलाडी अक्षयकुमारचा मुलगा सध्या भलताच चर्चेत आहे. तुम्ही म्हणाल की तो बॉलिवूडमध्ये येण्याची तयारी करीत आहे काय? तर नाही. तो बॉलिवूडमुळे नव्हे तर एका मिस्ट्री गर्लमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी जेव्हा तो या मिस्ट्री गर्लसोबत स्पॉट झाला होता, तेव्हा त्याचे चेहरा लपवितानाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. आता पुन्हा एकदा आरव त्याच मिस्ट्री गर्लससोबत बांद्रा परिसरात एका रेस्टॉरंटच्या बाहेर स्पॉट झाला. यावेळेसदेखील आरव चेहरा लपवित कारमध्ये बसून क्षणार्धात निघून गेला.
![]()
वास्तविक आरव माध्यमांच्या कॅमेºयांपासून नेहमीच दूर राहतो. यावेळेस जेव्हा तो त्याच्या मैत्रिणीबरोबर दिसला तेव्हा काही कॅमेरे दिशेने धावले. ही बाब जेव्हा आरवच्या लक्षात आली तेव्हा त्याने चेहरा लपवित कार गाठली. यावेळी त्याच्यासोबत पिंक ड्रेस घातलेली एक मुलगी होती. आरवसोबत दिसणारी ही मुलगी कोण, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच आरवला मुंबईमधील एका पीव्हीआरच्या बाहेर बघण्यात आले होते. यावेळेसदेखील एक मिस्ट्री गर्ल त्याच्यासोबत स्पॉट झाली होती. त्यावेळेसदेखील काही कॅमेरे बघताच त्याने चेहरा लपविला होता. विशेष कारमध्ये बसल्यानंतरही त्याने जॅकेटने त्याचा चेहरा लपविला होता.
![]()
दरम्यान, ज्या रेस्टॉरंटबाहेर आरव स्पॉट झाला त्याच रेस्टॉरंटबाहेर सोहेल खानचा मोठा मुलगा निर्वाणही बघावयास मिळाला. तसेच कोरिओग्राफर रेमो डिसूजाचा मुलगा गॅब्रियल डिसूजा हादेखील त्याठिकाणी बघावयास मिळाला. या रेस्टॉरंटमध्ये सेलिब्रिटींचे नेहमीच येणे-जाणे असते. आरवदेखील या ठिकाणी नेहमीच येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.