अक्षय कुमारच्या 'केसरी'चा दमदार ट्रेलर, पहा Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 19:47 IST2019-02-21T19:46:52+5:302019-02-21T19:47:21+5:30
अभिनेता अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षीत व बहुचर्चित चित्रपट केसरीचा दमदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे

अक्षय कुमारच्या 'केसरी'चा दमदार ट्रेलर, पहा Video
अभिनेता अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षीत व बहुचर्चित चित्रपट केसरीचा दमदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरला कमी कालावधीत खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या चित्रपटात अक्षय कुमार व परिणीची चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन निर्मित व अनुराग सिंग दिग्दर्शित केसरी चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
केसरी सिनेमा १८९७ साली झालेल्या सारागढी युद्धावर आधारीत आहे. भारताच्या इतिहासात लढलेली सर्वात धाडसी आणि अविश्वसनीय लढाई अशा शब्दात नेहमीच सारागढीच्या युद्धाचे वर्णन केले जाते. १० हजार सैन्याच्या रुपाने मृत्यू समोर असतानाही न डगमगता या २१ वीरांनी अखेरच्या श्वासांपर्यंत लढा देत आपले नाव इतिहासात सुवर्णाक्षरात अजरामर केले. या शौर्यगाथेची झलक केसरीच्या ट्रेलरमध्ये पहायला मिळत आहे.
सातारा जिल्ह्यातील वाईमध्ये मागच्या वर्षी जानेवारी २०१८ मध्ये केसरीच्या शुटींगला सुरुवात झाली होती. पण अचानक या सेटला आग लागल्याने मग उर्वरीत शूटींग अक्षय कुमार आणि परिणीती चोप्रा यांनी मुंबईतील फिल्म सिटीत पूर्ण केले. २१ मार्च रोजी ‘केसरी’ प्रदर्शित होत आहे.