अक्षयकुमारची लाडकी लेक नितारा बनली दिग्दर्शक; पहा तिने शूट केलेला व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 17:17 IST2017-09-09T11:45:52+5:302017-09-09T17:17:00+5:30

​बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार याचा आज वाढदिवस असून, त्याच्या परिवाराकडून त्यास स्पेशल करण्यासाठी चांगलीच प्लॅनिंग केल्याचे दिसून येत आहे.

Akshay Kumar's girlfriend, made director Nitin Kumar; Watch that video shot! | अक्षयकुमारची लाडकी लेक नितारा बनली दिग्दर्शक; पहा तिने शूट केलेला व्हिडीओ!

अक्षयकुमारची लाडकी लेक नितारा बनली दिग्दर्शक; पहा तिने शूट केलेला व्हिडीओ!

लिवूडचा खिलाडी अक्षयकुमार याचा आज वाढदिवस असून, त्याच्या परिवाराकडून त्यास स्पेशल करण्यासाठी चांगलीच प्लॅनिंग केल्याचे दिसून येत आहे. अक्षयची पत्नी ट्विंकल खन्नाने तर सोशल नेटवर्कवर अक्षयसाठी एक खूपच प्रेमळ आणि स्पेशल संदेश शेअर केला आहे. ट्विंकलने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये अक्षयची चिमुकली निताराचा आवाज आहे. तसेच व्हिडीओमध्ये अक्षयकुमारही बघावयास मिळत आहे. व्हिडीओमध्ये नितारा पप्पा अक्षयला वेगवेगळ्या पद्धतीच्या पोझ द्यायला सांगत आहे. तर पप्पा अक्षय आपल्या लेकीचे प्रत्येक इंस्ट्रक्शन फॉलो करीत आहे. 

नितारा म्हणतेय की, ‘पप्पा हॅपी फेस’ तर अक्षय लगेचच हॅपी फेसचे एक्सप्रेशन देताना दिसतो. पुन्हा नितारा म्हणतेय, ‘पप्पा सॅड फेस’ तर अक्षय सॅड फेस करतो. हा दोघा बाप-लेकीमधला व्हिडीओ मम्मी ट्विंकलने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हॅपी-हॅपी बर्थ-डे टू माय बेस्ट फ्रेंड, जगातील सर्वात चांगली व्यक्ती आणि खूप प्रेमळ बाप’ ट्विंकलच्या या शुभेच्छांनी अक्षय भारावून गेला नसेल तरच नवल. 
 

दरम्यान, अक्षयचा लेकीसोबतचा हा व्हिडीओ खूपच इंट्रेस्टिंग असून, त्यास चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. कारण केवळ दोन तासांतच हा व्हिडीओ दोन लाखांपेक्षा अधिक लोकांनी बघितला आहे. तर इन्स्टाग्रामवर अक्षयचे फॅन्स या व्हिडीओला मोठ्या संख्येने शेअर करीत आहेत. अक्षयला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना व्हिडीओचे कौतुक करीत आहेत. शिवाय त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थनाही करीत आहेत. 

दरम्यान, अक्षयचा आगामी ‘गोल्ड’ हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. रिमा कागदी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचे दुसरे पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. हे पोस्टर स्वत: अक्षयने शेअर केले आहे. दरम्यान, हे पोस्टर शेअर करण्याअगोदर अक्षयने काही ट्विट केले होते ज्यामध्ये त्याने लिहिले, २,६२,८०,००० मिनिटे ४,३८,००० तास १८,२५० दिवस २,६०७ आठवडे ६०० महिने आणि ५ दशक. 

Web Title: Akshay Kumar's girlfriend, made director Nitin Kumar; Watch that video shot!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.