KRKची 'भविष्यवाणी' ऐकून घाबरला अक्की? 'द कपिल शर्मा शो'मध्ये 'सेल्फी'चं प्रमोशन नाहीच??

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 04:29 PM2023-02-17T16:29:35+5:302023-02-17T16:31:46+5:30

Akshay Kumar, The Kapil Sharma Show : नवा सिनेमा म्हटलं की, अक्षय कुमार 'द कपिल शर्मा शो'मध्ये येणार म्हणजे येणार, हे ठरलेलं असतं. पण यावेळी नाही...!!

akshay kumar will not promote selfiee on the kapil sharma show krk TWEET | KRKची 'भविष्यवाणी' ऐकून घाबरला अक्की? 'द कपिल शर्मा शो'मध्ये 'सेल्फी'चं प्रमोशन नाहीच??

KRKची 'भविष्यवाणी' ऐकून घाबरला अक्की? 'द कपिल शर्मा शो'मध्ये 'सेल्फी'चं प्रमोशन नाहीच??

googlenewsNext

Akshay Kumar, The Kapil Sharma Show : अक्षय कुमारचा 'सेल्फी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या चित्रपटात प्रथमच अक्षय कुमार व इमरान हाश्मीची जोडी एकत्र दिसणार आहे. तूर्तास अक्षय या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. नवा सिनेमा म्हटलं की, अक्षय 'द कपिल शर्मा शो'मध्ये येणार म्हणजे येणार, हे ठरलेलं असतं. पण यावेळी नाही. होय, चर्चा खरी मानाल तर अक्षयने यावेळी 'द कपिल शर्मा शो'मध्ये (The Kapil Sharma Show)आपल्या या सिनेमाचं प्रमोशन न करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात हे आम्ही नाही तर कमाल आर खान अर्थात केआरकेनं दिलेली बातमी आहे.

तुम्हाला आठवत असेलच, केआरकेनं काही दिवसांपूर्वी 'द कपिल शर्मा शो'बद्दल एक ट्विट केलं होतं. यात त्याने ‘द कपिल शर्मा शो’ला पनवती म्हटलं होतं. शाहरूखने कपिल शर्मा शोमध्ये ‘पठाण’चं प्रमोशन केलं नाही आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला. कपिलच्या शोमध्ये ‘द काश्मिर फाइल्स’चंही प्रमोशन झालं नाही. तो चित्रपटही सुपरहिट झाला. यावरून हे सिद्ध होतं की, ‘द कपिल शर्मा शो’ बॉलिवूड चित्रपटांसाठी मोठी पनवती आहे. अन्य स्टार्स यातून धडा घेतील, ही अपेक्षा, असं तो ट्विटमध्ये म्हणाला होता. आता याच केआरकेनं आणखी एक ट्विट केलं आहे.

अखेर अक्षय कुमारने द कपिल शर्मामध्ये सेल्फीचं प्रमोशनमध्ये न जाण्याचा निर्णय घेत एक चांगलं काम केलं. कपिल शर्माचा शो चित्रपटांसाठी पनवती आहे,हे अक्कीलाही कळून चुकलंय, असं त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

अक्षय कुमार आणि इमरान हाश्मीचा 'सेल्फी' पुढील महिन्यात 24 फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्की आणि इमरान शिवाय अभिनेत्री नुसरत भरुचा आणि डायना पेंटी देखील आहेत.  

Web Title: akshay kumar will not promote selfiee on the kapil sharma show krk TWEET

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.