ख्रिसमसच्या मुहूर्तावर मोठा धमाका; 'वेलकम टू द जंगलचा टीझर प्रदर्शित, अक्षयचा डबल रोल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 16:04 IST2025-12-25T16:02:29+5:302025-12-25T16:04:38+5:30
'या' दिवशी 'वेलकम टू द जंगल' येणार प्रेक्षकांच्या भेटीला

ख्रिसमसच्या मुहूर्तावर मोठा धमाका; 'वेलकम टू द जंगलचा टीझर प्रदर्शित, अक्षयचा डबल रोल?
ख्रिसमस हा जगभरात उत्साह, प्रेम व आनंदाने साजरा केला जाणारा सण आहे. ख्रिश्चन धर्मासाठी हा अत्यंत मोठा दिवस असतो. मात्र, आज तो सण सर्वांसाठीच आनंदाचा उत्सव बनला आहे. ख्रिसमसचा उत्साह सर्वत्र असताना, बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने आपल्या चाहत्यांना सर्वात मोठी भेट दिली आहे. अनेक वेळा रिलीज डेट पुढे ढकलल्यानंतर, अखेर अक्षयच्या बहुप्रतिक्षित 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.
अक्षयने सोशल मीडियावर चित्रपटाच्या संपूर्ण स्टारकास्टचा एक धमाकेदार व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये वेलकमच्या थीमसोबत जिंगल बेल्सचा आवाज ऐकू येतोय आणि संपूर्ण कलाकारमंडळी चालताना दिसतात. या चित्रपटात अक्षयची दुहेरी भूमिका असल्याची माहिती आहे. एका भूमिकेत त्याचे केस पूर्णपणे पांढरे आहेत. तो या भूमिकेत वयस्कर दिसत आहे. तर, दुसऱ्या भूमिकेत अक्षय तरूण आणि फिट दिसत आहे.
अक्षयने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं, "'वेलकम टू द जंगल'च्या संपूर्ण टीमकडून तुम्हा सर्वांना ख्रिसमसच्या मनापासून शुभेच्छा. हा चित्रपट २०२६ मध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. इतक्या मोठ्या टीमचा मी कधीच भाग नव्हतो. आमच्यापैकी कुणीही नव्हतं. आम्ही या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना गिफ्ट देण्यास उत्सुक आहोत".
अहमद खान यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या या चित्रपटात बॉलिवूडच्या इतिहासातील आजवरची सर्वात मोठी स्टारकास्ट एकाच पडद्यावर दिसणार आहे. यात अक्षय कुमारसोबत संजय दत्त, सुनील शेट्टी, परेश रावल, अर्शद वारसी, रवीना टंडन, दिशा पटानी, जॅकलिन फर्नांडिस, श्रेयस तळपदे, राजपाल यादव, जॉनी लिव्हर आणि लारा दत्ता यासारखे तगडे कलाकार आहेत.
दरम्यान, 'वेलकम टू द जंगल' हा चित्रपट सुरुवातीला २०२४ च्या ख्रिसमसला प्रदर्शित होणार होता. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे तो २०२५ पर्यंत पुढे ढकलण्यात आला. आता निर्मात्यांनी सर्व अफवांना पूर्णविराम देत २०२६ ही तारीख निश्चित केली आहे.