Video:"तुझ्या आयुष्याची दिशा..."; अक्षयने सर्वांसमोर टायगरला चिडवलं, अशी होती अभिनेत्याची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 04:50 PM2024-03-26T16:50:56+5:302024-03-26T16:52:40+5:30

'बडे मिया छोटे मिया' सिनेमाचं प्रमोशन सध्या जोरात सुरु आहे. 'बडे मिया छोटे मिया' च्या ट्रेलर लॉंचवेळी अक्षयने टायगरला दिशाच्या नावावरुन चिडवलेलं दिसलं. तुम्हीही बघा

Akshay Kumar teased Tiger shroff for the name of disha patani in bade miyan chote miyan trailer launch | Video:"तुझ्या आयुष्याची दिशा..."; अक्षयने सर्वांसमोर टायगरला चिडवलं, अशी होती अभिनेत्याची प्रतिक्रिया

Video:"तुझ्या आयुष्याची दिशा..."; अक्षयने सर्वांसमोर टायगरला चिडवलं, अशी होती अभिनेत्याची प्रतिक्रिया

अक्षय कुमार - टायगर श्रॉफ सध्या 'बडे मिया छोटे मिया' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. अक्षय - टायगर 'बडे मिया छोटे मिया' निमित्ताने विविध व्हिडीओ आणि फोटोशूट करत आहेत. आज 'बडे मिया छोटे मिया' सिनेमाचा ट्रेलर लॉंच झाला. त्यावेळी अक्षयने टायगरला सर्वांसमोर दिशाच्या नावाने चिडवलं. त्यावेळी टायगरची प्रतिक्रिया बघण्यासारखी होती. वाचा सविस्तर.

'बडे मिया छोटे मिया'च्या ट्रेलर लॉंचला अक्षय-मानुषी छिल्लर-टायगर-अलाया हे सिनेमातले कलाकार उपस्थित होते. यावेळी एकाने अक्षयला विचारलं की, "यंगस्टार असलेल्या टायगरला तुम्ही काय सल्ला द्याल?" त्यावेळी अक्षय म्हणाला,"मे ये कहूंगा की टायगर एक ही दिशा मैं रहा करो." अक्षय असं म्हणताच टायगर गालातल्या गालात गोड हसला. याशिवाय अलाया, जॅकी भगनानी, मानुषी सर्वच खळखळून हसले. सर्वांना माहितच आहे की, टायगर - दिशा रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा होती. 

आज 'बडे मिया छोटे मिया' चा बहुप्रतिक्षित ट्रेलर लॉंच झालाय. या ट्रेलरमध्ये अक्षय - टायगरची अॅक्शन केमिस्ट्री पाहायला मिळते. याशिवाय साऊथ स्टार पृथ्वीराज सुकुमारन सिनेमात खलनायकाची भूमिका साकारणार आहे. सिनेमात मानुषी छिल्लर, अलाया आणि सोनाक्षी सिन्हाही प्रमुख भूमिकेत आहेत. हा सिनेमा १० एप्रिल २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Akshay Kumar teased Tiger shroff for the name of disha patani in bade miyan chote miyan trailer launch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.