"सिनेमे फ्लॉप होण्याचं सर्वात मोठं कारण...", अक्षय कुमार स्पष्टच बोलला; OTT वर फोडलं खापर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 10:52 IST2025-01-22T10:52:17+5:302025-01-22T10:52:41+5:30
अक्षय कुमार नेमकं काय म्हणाला?

"सिनेमे फ्लॉप होण्याचं सर्वात मोठं कारण...", अक्षय कुमार स्पष्टच बोलला; OTT वर फोडलं खापर?
अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kuamr) आगामी 'स्काय फोर्स' सिनेमात दिसणार आहे. २४ जानेवारी रोजी सिनेमा रिलीज होत आहे. सध्या अक्षय सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान अक्षयचे आधीचे अनेक सिनेमे सपशेल आपटले आहेत. गेल्या २ वर्षात त्याने एकही ब्लॉकबस्टर हिट दिलेला नाही. काही वर्षांपूर्वीही अक्षयचे सलग १६-१७ सिनेमे फ्लॉप झाले होते. त्याचा तोच काळ परत आल्याची चर्चा झाली. एकूणच इंडस्ट्री सध्या स्ट्रगल करत आहे. अनेक चित्रपट फ्लॉप होत आहेत. या सगळ्यावर आता अक्षयने स्वत:च उत्तर दिलं आहे.
'पिंकव्हिला'ला दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमार म्हणाला, "मी अनेक लोकांना भेटतो आणि त्यांच्याकडून हेच ऐकतो की 'आम्ही हा सिनेमा ओटीटीवर वर पाहू'. बॉक्सऑफिसवर सिनेमे फ्लॉप होण्याचं हे सर्वात मोठं कारण आहे. हेच तथ्य आहे. कोरोनानंतर लोक ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमे पाहत आहेत. आता ही सवयच बनली आहे. सिनेमाच्या रिलीजनंतर काहीच दिवसात तो ओटीटीवर आल्यावर घरबसल्या आरामात पाहता येईल असाच विचार आता प्रेक्षक करत आहेत."
तो पुढे म्हणाला, "मी २०२५ साठी खूप उत्सुक आहे. माझ्या आगामी सिनेमांची मला आतुरता आहे. माझे वेगवेगळ्या विषयांवरचे काही सिनेमे येणार आहेत. तर मला आशा आहे की माझं ७० टक्के नशीब चालेल आणि प्रेक्षक चित्रपट पाहायला थिएटरमध्ये येतील."
ल्या काही वर्षांपासून अक्षयचे ८ ते १० सिनेमे फ्लॉप झाले आहेत. 'बडे मियाँ छोटे मियाँ' या बिग बजेट सिनेमात तर तो टायगर श्रॉफसोबत दिसला. पण तरीही सिनेमा आपटला. याशिवाय 'राम सेतू', 'सम्राट पृथ्वीराज', 'रक्षा बंधन', 'सेल्फी' हे सिनेमे चालले नाहीत.