​अक्षय कुमार-रणवीर सिंगच्या डान्सची चर्चा जोरात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2017 16:06 IST2017-02-04T10:36:49+5:302017-02-04T16:06:49+5:30

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार व बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंह हे दोघेजी मुडी अभिनेत आहेत. ते कधी काय करतील याचा ...

Akshay Kumar - Ranveer Singh's dance show loud! | ​अक्षय कुमार-रणवीर सिंगच्या डान्सची चर्चा जोरात!

​अक्षय कुमार-रणवीर सिंगच्या डान्सची चर्चा जोरात!

लिवूडचा खिलाडी अक्षय कुमार व बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंह हे दोघेजी मुडी अभिनेत आहेत. ते कधी काय करतील याचा नेम नाही. सध्या ट्विटरवर त्यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही एकत्र नाचतान दिसत आहे. त्यांनी हा डान्स एका लग्नात केला असल्याचे सांगण्यात येते. 

काही दिवसापूर्वी अक्षय व रणवीर यांनी हैदराबादेत एका लग्नाला हजेरी लावली होती. या लग्नात रणवीर सिंगने डान्स केला असल्याचे अनेक फोटो व्हायरल झाले होते. मात्र अक्षयने डान्स केल्याचेही आता समोर आले असून दोघांच्या डान्सने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकुळ घालतला आहे. केशव रेड्डीच्या लग्नात अक्षय कुमारच्या चित्रपटातील हुक्का बार हे गाणे लागताच अक्षय स्वता:ला डान्स करण्यापासून रोखू शकला नाही. त्याने रणवीरला साथ देत स्टेजवर ठेका धरला. या लग्नाला बॉलिवूडच्या दिग्गज सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. अमिताभ व जया बच्चन, श्रीदेवी, सारा अली खान व शिल्पा शेट्टी देखील या लग्नाला उपस्थित असल्याचे फोटो सोशल मीडियावर आहेत. 

 
सध्या अक्षय कुमार आपल्या आगामी ‘जॉली एलएलबी २’ व रणवीर सिंह ‘पद्मावती’मुळे चर्चेत आहे. सुभाष कपूर दिग्दर्शित ‘जॉली एलएलबी २’मध्ये अक्षय कुमार एका वकिलाची भूमिका साकारत आहे. १० फे ब्रुवारीला हा चित्रपट रिलीज होणार असून यात हुमा कुरेशी व अन्नू कपूर यांच्या भूमिका आहेत. दुसरीकडे संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’मध्ये रणवीर सिंह अलाउद्दीन खिलजीची भूमिका साकारत असून या चित्रपटात दीपिका पादुकोण व शाहिद कपूर यांच्या भूमिका आहेत.  अक्षय कुमार व रणवीर सिंग यांनी स्टेजवर डान्स करण्याची ही पहिली वेळ नाही यापूर्वी दोघांनी एका अवॉर्ड फं क्शनमध्ये आपला डान्स सादर केला आहे. 

Web Title: Akshay Kumar - Ranveer Singh's dance show loud!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.