​‘नाम शबाना’त अक्षय कुमार देणार सरप्राईज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2017 09:38 IST2017-03-10T04:08:55+5:302017-03-10T09:38:55+5:30

या महिन्याच्या अखेरच्या दिवशी ‘नाम शबाना’ हा सिनेमा रिलीज होतोय. ‘बेबी’ या लोकप्रीय चित्रपटाचा प्रीक्वल असलेला हा चित्रपट पाहण्यास ...

Akshay Kumar named 'Sarprija' in 'Shabana' name! | ​‘नाम शबाना’त अक्षय कुमार देणार सरप्राईज!

​‘नाम शबाना’त अक्षय कुमार देणार सरप्राईज!

महिन्याच्या अखेरच्या दिवशी ‘नाम शबाना’ हा सिनेमा रिलीज होतोय. ‘बेबी’ या लोकप्रीय चित्रपटाचा प्रीक्वल असलेला हा चित्रपट पाहण्यास तुम्ही आम्ही सगळेच उत्सूक आहोत. तापसी पन्नू, मनोज वाजपेयी, डॅनी, अनुपम खेर अशी दमदार स्टारकास्ट असलेल्या या सिनेमात ‘बॉलिवूडचा खिलाडी’ अक्षय कुमार कॅमिओ करणार असल्याची खबर आहे. पण असे नाहीय. म्हणजे, ‘नाम शबाना’मध्ये अक्षयचा कॅमिओ नाहीय. तर अर्ध्या तासाच्या अतिशय दमदार भूमिकेत तो यात दिसणार आहे.
सूत्रांचे मानाल तर, सुपरस्टार म्हणून अक्षय यात घेतलेले नाही तर यात तो अतिशय महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. मध्यांतरापूर्वी काही क्षण आधी  चित्रपटात अक्षयची  एन्ट्री होणार आहे आणि मग मध्यंतरानंतर अर्धा तास चित्रपटात केवळ अक्षय आणि अक्षयच दिसणार आहे. अक्षय कुमार स्वत: या भूमिकेसाठी उत्सूक आहे. ‘नाम शबाना’ हा ‘बेबी’चा प्रीक्वल आहे, त्यामुळे अक्षयने या चित्रपटासाठी होकार दिला होता. या चित्रपटात ‘बेबी’च्या आधीची कथा दाखवली जाणार आहे.

ALSO READ : ‘नाम शबाना’च्या पोस्टरवर तापसी पन्नूचा अ‍ॅक्शन अवतार!

‘बेबी’या चित्रपटात तापसी पन्नूने शबाना ही भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेची चांगलीच प्रशंसा झाली होती. तब्बल दोन वर्षांनंतर शबानावर चित्रपटाची निर्मिती करण्याचे धाडस निर्मात्यांनी दाखविले असून हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे.  ‘बेबी’मध्ये तापसी एका महत्त्वपूर्ण भूमिकेत होती. पण चित्रपटात ती अगदी काही मिनिटांपुरती दिसली होती. ‘नाम शबाना’मध्ये मात्र पूर्णपणे तापसीचा बोलबाला असणार आहे. खुद्द अक्षय कुमार याने देखील तापसी हीच या चित्रपटाची ‘हिरो’ असल्याचे म्हटले आहे.मलेशियात या चित्रपटाचे शूटींग पार पडले.

Web Title: Akshay Kumar named 'Sarprija' in 'Shabana' name!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.