'हाऊसफूल ५'साठी किती पैसे घेतले? पत्रकाराचा अक्षय कुमारला प्रश्न, अभिनेता म्हणाला- "मी तुला..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 09:52 IST2025-05-28T09:51:41+5:302025-05-28T09:52:07+5:30
'हाऊसफूल ५'च्या ट्रेलर लॉन्चला सिनेमातील कलाकारांनी हजेरी लावली होती. या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला पत्रकाराने सिनेमासाठी घेतलेल्या मानधनाबद्दल प्रश्न विचारला. याचा व्हिडिओ समोर आला आहे.

'हाऊसफूल ५'साठी किती पैसे घेतले? पत्रकाराचा अक्षय कुमारला प्रश्न, अभिनेता म्हणाला- "मी तुला..."
'हाऊसफूल ५' या कॉमेडी बॉलिवूड सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. 'हाऊसफूल ५'च्या ट्रेलर लॉन्चला सिनेमातील कलाकारांनी हजेरी लावली होती. या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला पत्रकाराने सिनेमासाठी घेतलेल्या मानधनाबद्दल प्रश्न विचारला. याचा व्हिडिओ समोर आला आहे.
इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवरुन 'हाऊसफूल ५'च्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यातील एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये पत्रकार अक्षय कुमारला "साजिदकडून किती पैसे घेतलेस?" असा प्रश्न विचारत आहे. पत्रकाराच्या या प्रश्नावर अक्षय कुमार मिश्किल पद्धतीने उत्तर देतो. तो म्हणतो, "मी पैसे घेतले असतील तरी तुला का सांगू? तू माझा भाचा लागतो का, की मी तुला सांगू. मी खूप चांगले पैसे घेतले. सिनेमा चांगल्या बजेटमध्ये बनला. खूप मजा आली. आज आनंदाचा दिवस आहे. तू रेड टाकायला आला आहे का". अक्षय कुमारच्या या उत्तराने सगळेच हसायला लागल्याचं दिसत आहे.
दरम्यान, 'हाऊसफूल ५' सिनेमा येत्या ६ जूनला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या सिनेमात अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, नाना पाटेकर, श्रेयस तळपदे, जॅकी श्रॉफ, चंकी पांडे, जॅकलीन फर्नांडिस, संजय दत्त, नर्गिस फखरी, फरदीन खान, चित्रगंदा सिंह अशी स्टारकास्ट आहे. हा सिनेमा तरुण मनसुखानी यांनी दिग्दर्शित केला असून साजिद नाडियावालाने निर्मिती केली आहे.