आधाराचा हात... आसाममधील पूरग्रस्तांसाठी अक्षय कुमारकडून 1 कोटींची मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 02:12 PM2020-08-18T14:12:22+5:302020-08-18T14:14:54+5:30

मुख्यमंत्री म्हणाले, थँक्यू अक्षयकुमारजी...

Akshay Kumar Donates Rs 1 Crore for Assam Flood Relief, CM Sarbananda Sonowal Thanks Actor | आधाराचा हात... आसाममधील पूरग्रस्तांसाठी अक्षय कुमारकडून 1 कोटींची मदत

आधाराचा हात... आसाममधील पूरग्रस्तांसाठी अक्षय कुमारकडून 1 कोटींची मदत

googlenewsNext
ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशातील नागरिकांना पीएम केअर फंडसाठी आर्थिक मदत देण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत अक्षय कुमारने लगेच पीएम केअर फंडसाठी 25 कोटींची मदत केली होती.

कोरोना काळात गरजुंच्या मदतीसाठी धावून आलेला बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमारने आता आसामातील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. अक्षय कुमारने आसामातीन पूरग्रस्तांसाठी 1 कोटी रूपयांची मदत दिली आहे. अक्षयच्या या मदतीनंतर आसामच्या मुख्यमंत्र्यांनी त्याचे आभार मानले आहेत.
देशाच्या अनेक भागात पूराचे थैमान आहे. विशेषत: आसाममध्ये पूरस्थिती गंभीर आहे. हजारो लोकांचे संसार पुराने उद्धवस्त केले आहेत. राज्यात पुरामुळे 23 जिल्ह्यांतील जवळपास 10 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. या पूरग्रस्तांसाठी अक्षयने आसामच्या मुख्यमंत्री सहायता निधीत 1 कोटी रूपयांची मदत दिली.

मुख्यमंत्री म्हणाले, थँक्यू अक्षयकुमारजी...


अक्षयच्या या मदतीनंतर आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी ट्वीट करत अक्षयचे आभार मानलेत. ‘थँक्यू अक्षय कुमारजी.   संकटाच्या काळात तुम्ही नेहमी धावून येता. तुम्ही आसामचे खरे मित्र आहात. जगभर तुम्ही किर्तीवैभव वाढावे, या शुभेच्छा,’असे ट्वीट सर्बानंद यांनी केले.

कोरोना काळातही अक्षयने केली मदत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशातील नागरिकांना पीएम केअर फंडसाठी आर्थिक मदत देण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत अक्षय कुमारने लगेच पीएम केअर फंडसाठी 25 कोटींची मदत केली होती. याशिवाय अक्षय कुमारने मुंबई महानगरपालिकेला मास्क आणि टेस्टिंग किट्ससाठी 3 कोटींची मदत केली होती. लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेकडो कलाकारांच्या खात्यात रोख रक्कमही त्याने जमा केली होती.
 

Web Title: Akshay Kumar Donates Rs 1 Crore for Assam Flood Relief, CM Sarbananda Sonowal Thanks Actor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.