५४ कोटी मानधन घेणारा अक्षय कुमार, जगतो असे जीवन वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2019 02:13 PM2019-08-02T14:13:52+5:302019-08-02T14:16:25+5:30

वाढत्या लोकप्रियतेमुळे त्याने त्याचं मानधन दुपटीने वाढवण्याचा निर्णय घेतलाय.

Akshay Kumar charged 54 cr Fees For a Film but lives Simple life | ५४ कोटी मानधन घेणारा अक्षय कुमार, जगतो असे जीवन वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य !

५४ कोटी मानधन घेणारा अक्षय कुमार, जगतो असे जीवन वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य !

googlenewsNext

'खिलाडियो का खिलाडी' म्हणजे अक्की अर्थात अक्षय कुमार.. काम कोणतंही असो खिलाडी अक्की त्यात अव्वल... अभिनय असो किंवा इतर कोणतंही काम त्यात अक्की कोणतीही कसर सोडत नाही. प्रत्येक कामात एव्हरेडी असणारा सळसळता उत्साह, जोष, जल्लोष आणि मेहनत हेच खिलाडी अक्षयच्या यशाचे खरं कारण आहे.

 

 

त्यामुळेच आता भारतीय चित्रपटसृष्टीतील सगळ्यात महागडा अभिनेत्याच्या यादीत अक्षय कुमारचे नाव सामील झाले आहे.  कारण अक्षयने आपलं मानधन दुप्पट केले असून  प्रत्येक चित्रपटासाठी तो तब्बल ५४ कोटी मानधन घेतो. आत्तापर्यंत तो प्रत्येक चित्रपटासाठी २७ कोटी मानधन घेत असे. मात्र वाढत्या लोकप्रियतेमुळे त्याने त्याचं मानधन दुपटीने वाढवण्याचा निर्णय घेतलाय.  


मात्र इतकं मानधन घेऊनही तो त्याचं जीवन सरळ साध्या मार्गाने जगतो. त्याच्या वागण्या, बोलण्यात कुठलाही बडेजावपणा जाणवत नाही. इतकंच नाही तर सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी त्याच्या मनात वेगळे स्थान आहे. त्यामुळे आपल्या कमाईचा बहुतांशी हिस्सा हा लष्काराच्या शूर जवानांसाठी दान करतो. इतकंच नाही तर विविध सामाजिक कार्यातही अक्कीचा पुढाकार असतो. शिवाय मोजक्या करदात्या सेलिब्रिटींमध्येही तो आघाडीवर असतो. 


आपल्या कामावरील प्रेम, जिद्द आणि मेहनतीमुळे अक्षयने नवी उंची गाठली असून तो रसिकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. कोणतंही काम करताना तो त्याच उत्साहाने तो काम करतो. त्यामुळं आजवर जीवनात कितीही चढउतार आले तरी तो डगमगला नाही. कोणतंही काम उत्साह, जिद्द आणि मेहनतीने केल्यास जीवनात अशक्य असं काही राहणार नाही आणि प्रत्येकजण बनेल खिलाडींयो का खिलाडी.

Web Title: Akshay Kumar charged 54 cr Fees For a Film but lives Simple life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.