अक्षय कुमारने T1 प्रायमा रेसिंगची केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2017 19:37 IST2017-03-19T14:03:18+5:302017-03-19T19:37:16+5:30

अभिनेता अक्षय कुमार याने नुकतेच टाटा टी १ प्रायमा ट्रक रेसिंगच्या चौथ्या सिजनची एकप्रकारे घोषणा केली आहे. जेव्हा प्रायमा ...

Akshay Kumar announces the T1 Primo Racing | अक्षय कुमारने T1 प्रायमा रेसिंगची केली घोषणा

अक्षय कुमारने T1 प्रायमा रेसिंगची केली घोषणा

िनेता अक्षय कुमार याने नुकतेच टाटा टी १ प्रायमा ट्रक रेसिंगच्या चौथ्या सिजनची एकप्रकारे घोषणा केली आहे. जेव्हा प्रायमा ट्रक रेसिंग चॅम्पियनशिप बघणाºया प्रेक्षकांनी अक्षय कुमार याला नोएडा येथील बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर बघितले तेव्हा निश्चितच त्यांचे अचानक तपमान वाढले असेल. हे टी १ प्रायमा रेसिंग चॅम्पियनशिपचे चौथे सत्र आहे. उत्तर प्रदेशातील नोएडास्थित बीआयसीमध्ये तिन्ही चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी अक्षय कुमार टाटा वाणिज्यिक वाहन विंगचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर असल्याने त्याने याबाबतची संपूर्ण माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. 

टी१ प्रायमा ट्रक रेसिंग संपूर्णत: फॉर्म्युला वन रेसिंगप्रमाणे आहे. फक्त या रेसिंगमध्ये कारऐवजी ट्रक पळविले जातात. हा इव्हेंट टाटा मोटर्सकडून होस्ट केला जातो. या चॅम्पियनशिपची तीन गटात वर्गवारी करण्यात आलेली आहे. ‘प्रो क्लास, सुपर क्लास, सुपर क्लास आणि चॅम्पियन क्लास’ अशी ती वर्गवारी आहे. त्यामुळे या चॅम्पियनशिपमध्ये एक वेगळाच थरार अनुभवयास मिळतो. वास्तविक अक्षयला थरारशी संबंधित असलेल्या स्पर्धांचे सुरुवातीपासूनच आकर्षण राहिले आहे. अशात अक्षय या चॅम्पियनशिपची घोषणा करीत असल्याने रेसिंग फॅन्समध्ये उत्साहाचे वातावरण नसेल तरच नवल. 

दरम्यान, अक्षय कुमार सध्या त्याच्या करिअरमध्ये यशाची चव चाखत आहे. ‘जॉली एलएलबी-२’च्या जबरदस्त यशानंतर तो यावर्षी आणखी काही महत्त्वपूर्ण प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. त्यातील ‘नाम शबाना, टॉयलेट एक प्रेम कथा, २.०’ हे सिनेमे रिलीजसाठी तयार आहेत. त्याचबरोबर तो ‘पॅडमॅन’सारख्या संवेदनशील सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. हा सिनेमा वास्तविक कथेवर आधारित असून, ए. मुरुगनाथम या व्यक्तीची तो भूमिका साकारत आहे. 
 

Web Title: Akshay Kumar announces the T1 Primo Racing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.