अक्षयने केले आलियाचे कौतुक
By Admin | Updated: August 14, 2016 03:26 IST2016-08-14T03:26:14+5:302016-08-14T03:26:14+5:30
अक्षय कुमारचा चित्रपट ‘रुस्तम’ प्रदर्शित झाला. बॉक्स आॅफिसवर उत्तम प्रतिसादही चाहत्यांकडून मिळत आहे. मात्र, प्रमोशनदरम्यान ‘बी टाऊन’च्या काही सेलिब्रिटींनी

अक्षयने केले आलियाचे कौतुक
अक्षय कुमारचा चित्रपट ‘रुस्तम’ प्रदर्शित झाला. बॉक्स आॅफिसवर उत्तम प्रतिसादही चाहत्यांकडून मिळत आहे. मात्र, प्रमोशनदरम्यान ‘बी टाऊन’च्या काही सेलिब्रिटींनी ‘रुस्तम’च्या प्रमोशनसाठी काही अॅक्ट करून सोशल मीडियावर पोस्ट केले होते. यात रणवीर सिंग, करण जोहर, अर्जुन कपूर इतर जणही होते. त्यात आलिया भट्ट ही आघाडीवर होती. तिने ‘टिप टिप बरसा पानी’ या गाण्यावर रवीना टंडनप्रमाणे डान्स करून प्रमोशन केले. हे गाणे एव्हरग्रीन पावसाच्या गाण्यांपैकी एक आहे. आलियाने गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना म्हटले आहे की, ‘क्या कर रहे हो यार, कट! मुझे क्या देख रहें हो...जाके ‘रुस्तम’ देखो ना..!’ अक्षयला तिचा हा व्हिडीओ प्रचंड आवडला आणि त्याने तिचे कौतुक के ले.