अक्की-अर्जुन का टाळत आहेत कॅटला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2016 18:50 IST2016-12-25T18:50:37+5:302016-12-25T18:50:37+5:30

कॅटरिना कैफ ही ‘बी टाऊन’ची सर्वांत हॉट अ‍ॅण्ड सेक्सी अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्यासोबत डेटवर जायला किंवा चित्रपटात काम करायला ...

Akki and Arjun are avoiding Katla? | अक्की-अर्जुन का टाळत आहेत कॅटला?

अक्की-अर्जुन का टाळत आहेत कॅटला?

टरिना कैफ ही ‘बी टाऊन’ची सर्वांत हॉट अ‍ॅण्ड सेक्सी अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्यासोबत डेटवर जायला किंवा चित्रपटात काम करायला कुणाला आवडणार नाही. पण, तुम्हाला माहितीये का? अक्षय कुमार आणि अर्जुन कपूर यांनी कॅटरिनाचा भाऊ होण्यास नकार दिला होता म्हणे. होय, तिने हे नुकतेच एका रिअ‍ॅलिटी शोवर तिच्या चाहत्यांसोबत शेअर केले. तिने ‘या’ दोन भावाच्या शोधाचे किस्से सांगितले.



कॅटरिनाला सहा बहिणी असल्याने तिला एका भावाची अपेक्षा होती. म्हणून बॉलिवूडमधील एक तरी अभिनेता माझा भाऊ होईल का? असा शोध तिने सुरू केला. मात्र, अक्षय-अर्जुन यांनी तिचा भाऊ होण्यास तयारी दर्शवली नाही. २०१० मध्ये अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफ यांचा ‘तीस मार खान’ प्रदर्शित झाला होता. ‘शीला की जवानी’ गाण्याच्या शूटिंगवेळी तिने अक्कीकडे भावाच्या नात्याचा प्रस्ताव ठेवला. तेव्हा त्याने हे नातं नाकारलं. त्यानंतर ती अर्जुन कपूरकडे या नात्याचा प्रस्ताव घेऊन गेली. तेव्हा तिचा हा प्रस्ताव सहन न झाल्याने अर्जुन चक्क सुरू असलेल्या पार्टीतून निघून गेला आणि परत पार्टीत आलाच नाही.

Web Title: Akki and Arjun are avoiding Katla?