अजय देवगणच्या 'तानाजी-द अनसंग वॉरियर'तील फर्स्ट लूक आऊट..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 11:26 IST2019-01-02T11:17:26+5:302019-01-02T11:26:57+5:30

अजय देवगणचा सिनेमा 'तानाजी-द अनसंग वॉरियर'ची घोषणा झाल्यापासूनच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. नुकताच या सिनेमातील अजय देवगणचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे.

Ajay Devgn's first look out in taanaji the unsung warrior movie | अजय देवगणच्या 'तानाजी-द अनसंग वॉरियर'तील फर्स्ट लूक आऊट..

अजय देवगणच्या 'तानाजी-द अनसंग वॉरियर'तील फर्स्ट लूक आऊट..

ठळक मुद्दे या सिनेमाचे बजेच जवळपास १५० कोटींचे आहे या सिनेमात अजयसोबत सैफ अली खानसुद्धा दिसणार आहे

अजय देवगणचा सिनेमा 'तानाजी-द अनसंग वॉरियर'ची घोषणा झाल्यापासूनच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. नुकताच या सिनेमातील अजय देवगणचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे. नव्या वर्षांच्या सुरुवातीला अजय देवगणने त्याच्या फॅन्ससाठी गिफ्ट दिले आहे.     

 

 



सिनेमाचा दिग्दर्शक ओम राऊतने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर अजय देवगणचे पोस्टर शेअर केले आहे. यात अजयच्या हातात तलवार दिसतेय. सिनेमात अजय देवगण तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारणार आहेत. या सिनेमाचे बजेच जवळपास १५० कोटींचे आहे. यातील सर्वाधिक खर्च वीएफएक्सवर करण्यात येणार आहे. या सिनेमात अजयसोबत सैफ अली खानसुद्धा दिसणार आहे. सैफ शिवाजी महाराजांच्या भूमिकी साकारणार आहे. 

अजयला तानाजीच्या भूमिकेत पाहणे, चाहत्यांसाठी कुठल्या भेटीपेक्षा कमी नसणार आहे. यात अजय एकदम वेगळ्या अवतारात दिसेल. अजय दीर्घकाळापासून या प्रोजेक्टवर काम करत होता. स्वत: अजय या चित्रपटाबद्दल कमालीचा उत्सूक आहे. कोंढाणा जिंकूण आणण्यासाठी तानाजींनी प्राणांची बाजी लावली होती. तानाजी हे बारा हजार हशमांचे (पायदळ) सुभेदार होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा घेतली. त्यांच्यासोबत त्यांच्या काही सहकाऱ्यांनीदेखील शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्य मिळवण्यासाठी लढण्याची शपथ घेतली होती. तानाजी हे शिवाजी महाराजांच्या या मौल्यवान सहकाऱ्यांपैकी एक होते. अजय देवगणला तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत पाहणे कमालीचे ठरणार आहे. 'तानाजी-द अनसंग वॉरियर' हा चित्रपट 29 नोव्हेंबर, 2019ला प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Ajay Devgn's first look out in taanaji the unsung warrior movie