Bholaa Teaser 2: एक चट्टान, सौ शैतान..., जबरदस्त आहे अजय देवगणच्या ‘भोला’चा दुसरा टीझर, तुम्ही पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 12:16 PM2023-01-24T12:16:16+5:302023-01-24T12:16:45+5:30

Bholaa Teaser 2: तब्बू झलक...अजयची धमाकेदार ॲक्शन... एकंदर काय तर हा टीझर जबरदस्त आहे.

ajay devgn tabu starrer bholaa teaser 2 out | Bholaa Teaser 2: एक चट्टान, सौ शैतान..., जबरदस्त आहे अजय देवगणच्या ‘भोला’चा दुसरा टीझर, तुम्ही पाहिलात का?

Bholaa Teaser 2: एक चट्टान, सौ शैतान..., जबरदस्त आहे अजय देवगणच्या ‘भोला’चा दुसरा टीझर, तुम्ही पाहिलात का?

googlenewsNext

Bholaa Teaser 2: बॉलिवूडचा ‘सिंघम’ अजय देवगणच्या ( Ajay Devgn ) नुकत्याच रिलीज ‘दृश्यम 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आता त्याच्या ‘भोला’ (Bholaa ) या आगामी सिनेमानं प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वी अजयने ‘भोला’चा टीझर रिलीज केला होता. या टीझरने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. अजय देवगणचा सॉलिड लुक, दमदार अ‍ॅक्शन, जबरदस्त बॅकग्राऊंड म्युझिक असं सगळं पाहून चाहते क्रेझी झाले होते. आता अजयने ‘भोला’चा दुसरा टीझर शेअर केला आहे.  

गेल्यावर्षी २२ नोव्हेंबरला ‘भोला’चा पहिला टीझर रिलीज झाला होता. आज या चित्रपटाचा दुसरा टीझर रिलीज करण्यात आला. पहिल्या टीझरमध्ये तब्बू नव्हती. पण दुसऱ्या टीझरमध्ये तिची झलकही पाहायला मिळतेय. शिवाय अजयची धमाकेदार ॲक्शन तर आहेच. एकंदर काय तर हा टीझर जबरदस्त आहे.

‘भोला’ हा अजयच्या फिल्मी करिअरमधील आत्तापर्यंतचा सर्वात आव्हानात्मक सिनेमा असल्याचं म्हटलं जात आहे. या वन मॅन आर्मी सिनेमात अजय एका दमदार भूमिकेत दिसणार आहे.

अजय देवगण व तब्बूचा ‘भोला’ 30 मार्च 2023 रोजी रिलीज होतोय. हा सिनेमा अजयने स्वत: दिग्दर्शित केला आहे. चित्रपट तामिळ चित्रपट ‘कॅथी’चा रिमेक आहे. ओरिजनल सिनेमात साऊथ स्टार कार्थी लीड रोलमध्ये होता. ‘भोला’मध्ये अजय देवगण लीड रोलमध्ये आहे. त्याच्यासोबत तब्बू, संजय मिश्रा व दीपक डोबरियाल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘कॅथी’ एक कल्ट क्लासिक सिनेमा आहे. अजय देवगण हिंदी प्रेक्षकांसाठी हा सिनेमा 3 डीमध्ये घेऊन येतोय.

Web Title: ajay devgn tabu starrer bholaa teaser 2 out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.