अजय देवगणच्या 'त्या' कृतीनं वेधलं लक्ष, नेटकऱ्यांकडून होतोय कौतुकाचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 14:19 IST2025-08-18T14:18:36+5:302025-08-18T14:19:02+5:30
सोशल मीडियावर अजय देवगण याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे

अजय देवगणच्या 'त्या' कृतीनं वेधलं लक्ष, नेटकऱ्यांकडून होतोय कौतुकाचा वर्षाव
सुपरस्टार अजय देवगण त्याच्या दमदार अभिनयामुळे आणि हिट चित्रपटांमुळे ओळखला जातो. बॉलिवूडचा सिंघम अलीकडेच एका खास कृतीमुळे चर्चेत आला आहे. नुकतंच अजय देवगण हा विमानतळावर स्पॉट झाला. यावेळी त्यांच्या कृतीने चाहत्यांचं मन जिंकलं असून, नेटकऱ्यांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सोशल मीडियावर अजय देवगण याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अजय देवगण गाडीत बसताना दिसतो. यावेळी गाडीत बसताच त्याने सर्वात आधी गाडीत ठेवलेल्या देवाच्या मूर्तीचं दर्शन घेतलं. पापाराझींनी कॅमेऱ्यात कैद केलेलं हे दृश्य आता नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. काही नेटकऱ्यांनी त्याच्या संस्कारशील वृत्तीचं अभिनंदन केलं. तर काहींनी लिहिलं की, "यामुळेच अजय देवगण इतरांपेक्षा वेगळा आहे".
अजय देवगणच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याचा अलिकडेच 'सन ऑफ सरदार २' (Son Of Sardar 2 Movie) हा चित्रपट १ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. विजय कुमार अरोरा दिग्दर्शित या चित्रपटाला समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तसेच या सिनेमानं बॉक्स ऑफिसवरदेखील दमदार कामगिरी केली. तर 'सन ऑफ सरदार २' अजय देवगण याचा 'रेड २' प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. २०१८ साली प्रदर्शित झालेल्या 'रेड' या सिनेमाचा हा सीक्वल होता. ज्यामध्ये अजय देवगण आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसला होता.