"कोणालाही युद्ध नको आहे, पण त्याशिवाय..." अजय देवगणनं मांडलं स्पष्ट मत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 10:09 IST2025-05-15T10:08:31+5:302025-05-15T10:09:01+5:30

भारत-पाकिस्तान संघर्षावर अभिनेता अजय देवगण याने आपलं रोखठोक मत माडलं आहे. 

Ajay Devgn Salutes Indian Army At Karate Kid Trailer Launch India Vs Pakistan Tension | "कोणालाही युद्ध नको आहे, पण त्याशिवाय..." अजय देवगणनं मांडलं स्पष्ट मत!

"कोणालाही युद्ध नको आहे, पण त्याशिवाय..." अजय देवगणनं मांडलं स्पष्ट मत!

Ajay Devgn Breaks Silence On Operation Sindoor:  काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर देशभर विविध भावनांच्या लाटा उसळल्या. त्यासोबत प्रत्युत्तर म्हणून भारताकडून करण्यात आलेल्या लष्करी कारवाईची चर्चा देशभरात झाली. यादरम्यान काही जण उघडपणे 'युद्ध नको' अशी भूमिका घेताना दिसले. पण, अनेकांनी भारताच्या लष्कारी कारवाईचं कौतुक करत पाठिंबा दर्शवला. पाकिस्तान नेहमी आपल्या देशामध्ये आगळीक करत आला आहे. त्यामुळं त्यांच्या कायमचं लक्षात राहील, अशी अद्दल घडवण्यासाठी 'आर या पार'ची वेळ आल्याचं म्हटलं. यातच आता अभिनेता अजय देवगण यानेही यावर आपलं मत माडलं आहे. 

नुकतंच मुंबईत बुधवारी संध्याकाळी 'कराटे किड लेजेंड' या हॉलिवूड चित्रपटाचा हिंदी ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या हिंदी ट्रेलर लाँच कार्यक्रमाला अजय देवगण त्याचा लेक युग याच्यासह उपस्थित होता. 'कराटे किड लेजेंड' चित्रपटातील जॅकी चॅनच्या मिस्टर हान या व्यक्तिरेखेला अजय देवगणने आवाज दिला आहे. तर युग देवगणने ली फोंगला आपला आवाज दिला आहे. या लाँच इव्हेंटमध्ये अजय देवगणने भारत-पाकिस्तान तणावावर भाष्य केलं. तसेच सशस्त्र दलांना सलाम केला. 

अजय देवगण म्हणाला, 'कोणालाही युद्ध नको आहे पण दुसरा पर्याय उरला नाही. मी आपल्या भारतीय सशस्त्र दलांना सलाम करतो. पंतप्रधान मोदी आणि सरकार यांनाही माझा सलाम. कारण, त्यांनी जे करायला हवं होतं तेच केले. त्यांनी खरोखरच खूप चांगलं काम केलं आहे", या शब्दात अभिनेत्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं. यानंतर कार्यक्रमात सर्वांनी 'जय हिंद' असा जयघोष केला. 


भारत पाकिस्तान संघर्ष

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने 'ऑपरेशन सिंदूर' मोहिम फत्ते केली. ज्यामध्ये २६ लोकांचा मृत्यू झाला होता. या ऑपरेशन अंतर्गत, भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी स्थळांवर हल्ले केले होते. यानंतर चवताळलेल्या पाकिस्तानकडून भारतीय लष्करी तळांवर मारा करण्यासाठी हवेत ड्रोन्स सोडल. पण, भारताने ते हल्ले परतावून लावत तितक्याच जोराने प्रतिहल्ला केला आणि भारताने पाकिस्तानला सळो की पळो करुन सोडलं. तब्बल चार दिवस भारत आणि पाकिस्तानी सैन्याकडून (Pakistan Army) एकमेकांवर  हवाई हल्ले सुरु होते. मात्र, शनिवारी संध्याकाळी अमेरिकेच्या (America) मध्यस्थीमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली. 
 

Web Title: Ajay Devgn Salutes Indian Army At Karate Kid Trailer Launch India Vs Pakistan Tension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.