Raid 2 : अजय देवगण पुन्हा दिसणार IRS अधिकाऱ्याच्या भूमिकेत; 'रेड २'च्या शूटिंगला सुरुवात, रिलीज डेटही ठरली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2024 01:07 PM2024-01-07T13:07:01+5:302024-01-07T13:07:23+5:30

'रेड'नंतर चाहते या सिनेमाच्या सीक्वलच्या प्रतिक्षेत होते. आता अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. 

ajay devgn raid 2 movie will released on 15 november 20223 actor starts shooting of raid sequel | Raid 2 : अजय देवगण पुन्हा दिसणार IRS अधिकाऱ्याच्या भूमिकेत; 'रेड २'च्या शूटिंगला सुरुवात, रिलीज डेटही ठरली

Raid 2 : अजय देवगण पुन्हा दिसणार IRS अधिकाऱ्याच्या भूमिकेत; 'रेड २'च्या शूटिंगला सुरुवात, रिलीज डेटही ठरली

बॉलिवूड अभिनेता मुख्य भूमिकेत असलेला 'रेड' हा सिनेमा २०१८ साली प्रदर्शित झाला होता. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून १९८० सालात सरदार इंजर सिंग या व्यावसियाकाच्या घरी करण्यात आलेल्या छापेमारीवर आधारित हा सिनेमा होता. तब्बल ३ दिवस ही छापेमारी सुरू होती. या सिनेमात अजय देवगणने IRS ऑफिसर अमेय पटनाईक यांची भूमिका साकारली होती. या सिनेमाला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला होता. 'रेड'नंतर चाहते या सिनेमाच्या सीक्वलच्या प्रतिक्षेत होते. आता अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. 

'रेड २' च्या शूटिंगला सुरुवात झाली असून हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'रेड'चे दिग्दर्शक अभिषेक पाठकने याबाबत एक पोस्ट शेअर करत 'रेड २'ची रिलीज डेट जाहीर केली आहे. अजय देवगणनेही याबाबत पोस्ट शेअर करत शूटिंग सुरू झाल्याचं म्हटलं आहे. सुप्रसिद्ध साउथस्टार रवी तेजाच्या हातून मुहुर्ताची सुरुवात करण्यात आली. 'रेड २' मधून अजय देवगण पुन्हा एकदा IRS अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. "नवीन केस, नवीन सुरुवात...'रेड २'च्या शूटिंगला सुरुवात. रवी तेजा थँक्यू", असं अजयने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

अभिषेक पाठक दिग्दर्शित 'रेड २' हा सिनेमा २०२४च्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १५ नोव्हेंबर २०२४ रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 'रेड'मध्ये अजय देवगणबरोबर इलियाना डिक्रुज, सौरभ शुक्ला हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. आता 'रेड २'मध्ये कोणते कलाकार दिसणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. 

Web Title: ajay devgn raid 2 movie will released on 15 november 20223 actor starts shooting of raid sequel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.