Drishyam 2 Teaser Out: मेरा नाम विजय साळगावकर है, ये मेरा कन्फेशन है...! पाहा, ‘दृश्यम 2’चा Recall Teaser...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 01:41 PM2022-09-29T13:41:44+5:302022-09-29T13:42:16+5:30

Drishyam 2 Teaser Out: अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’ या चित्रपटाचा टीझर रिलीज झालाये. 1 मिनिट 22 सेकंदाचा हा टीझर पाहून तुमच्या ‘दृश्यम’च्या आठवणी ताज्या होतील.

Ajay Devgn Drishyam 2 Teaser Out Vijay Salgaonkar Recalls Old Secret With Confession | Drishyam 2 Teaser Out: मेरा नाम विजय साळगावकर है, ये मेरा कन्फेशन है...! पाहा, ‘दृश्यम 2’चा Recall Teaser...!!

Drishyam 2 Teaser Out: मेरा नाम विजय साळगावकर है, ये मेरा कन्फेशन है...! पाहा, ‘दृश्यम 2’चा Recall Teaser...!!

googlenewsNext

अजय देवगणच्या (Ajay Devgn) ‘दृश्यम 2’ (Drishyam 2) या चित्रपटाचा टीझर रिलीज झालाये. 1 मिनिट 22 सेकंदाचा हा टीझर पाहून तुमच्या ‘दृश्यम’च्या आठवणी ताज्या होतील. ‘दृश्यम’ 2015 साली रिलीज झाला होता आणि तुफान गाजला होता. अजय देवगण, श्रिया सरन, तब्बू यांच्या अभिनयाने सजलेल्या या सिनेमाचा सीक्वल येणार म्हणून चाहते खुश्श आहेत. ‘दृश्यम 2’या सिनेमाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. तर आता ही प्रतीक्षा संपली आहे. ‘दृश्यम 2’ लवकरच तुमच्या भेटीस येणार आहे. त्याआधी चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.

‘दृश्यम 2’च्या टीझरमध्ये ‘दृश्यम’च्या आठवणी ताज्या केल्या आहेत. पहिल्या पार्टमधील अनेक सीन्स एकापाठोपाठ येतात आणि शेवटी दुसऱ्या पार्टची अर्थात ‘दृश्यम 2’ची झलक पाहायला मिळते. यात अजय देवगण आपला कबुली जबाब नोंदवताना दिसतो. विजय साळगावकर आपला गुन्हा कबुल करतो की घडलेला गुन्हा पुन्हा एकदा तो शिताफीने लपवतो? याचं उत्तर तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतरच मिळणार आहे.

पण तूर्तास ‘दृश्यम 2’च्या टीझरने चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवली आहे. सोशल मीडियावर सध्या ‘दृश्यम 2’च्या टीझरचीच चर्चा आहे. ‘दृश्यम 2’मध्ये अजय देवगणसोबत  अक्षय खन्ना, तब्बू, श्रिया सरन, रजत कपूर, इशिता दत्ता लीड रोलमध्ये आहेत. अभिषेक पाठकने दिग्दर्शित केलेला हा सिनेमा 18 नोव्हेंबर 2022 रोजी चित्रपटगृहांत धडकणार आहे.

‘दृश्यम 2’चा टीझर रिलीज करण्याच्या काही तास आधी अजयने चित्रपटाचं नवं पोस्टर रिलीज केलं होतं. यात अजय संपूर्ण कुटुंबासोबत एकत्र बसून लंच एन्जॉय करताना दिसतोय. डायनिंग टेबलवर सगळे खूश्श दिसत आहेत. ‘जो दिख रहा है, वो हुआ नहीं, जो हुआ है, वो किसी को पता नहीं,’ असं कॅप्शन अजयने या पोस्टरला दिलं होतं.

हे नवं पोस्ट पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. ‘दृश्यम’ हा सिनेमा निशिकांत कामत यांनी दिग्दर्शित केला होता. हा 2013 मध्ये रिलीज झालेल्या एका मल्याळम सिनेमाचा हिंदी रिमेक होता. ‘दृश्यम 2’ हा सुद्धा मल्याळम सिनेमाचाच हिंदी रिमेक आहे.

Web Title: Ajay Devgn Drishyam 2 Teaser Out Vijay Salgaonkar Recalls Old Secret With Confession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.