'गोलमाल 4' नंतर अजय देवगण आणि रोहित शेट्टी तयार करणार 'सिंघम 3'
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 12:26 IST2017-08-10T06:48:55+5:302017-08-10T12:26:15+5:30
अजय देवगण आणि रोहित शेट्टीच्या फॅन्ससाठी फॅन्ससाठी एक खूषखबर आहे. अजय देवगण आणि रोहित शेट्टी पुन्हा एकदा एकत्र काम ...

'गोलमाल 4' नंतर अजय देवगण आणि रोहित शेट्टी तयार करणार 'सिंघम 3'
अ य देवगण आणि रोहित शेट्टीच्या फॅन्ससाठी फॅन्ससाठी एक खूषखबर आहे. अजय देवगण आणि रोहित शेट्टी पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहेत. 'गोलमाल अगेन' नंतर दोघेही 'सिंघम 3' मध्ये एकत्र काम करणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच अजय आणि रोहित सिंघम3 च्या कामाला सुरुवात करणार आहेत. काही दिवसांपूर्वीच गोलमाल अगेनची टीमची हैदराबादला गेली होती. याठिकाणी त्यांनी गोलमाल अगेनचे टायटल साँग शूट केले. या टायटल साँगसाठी अजय देवगण, परिणीती चोप्रा, अर्शद वारसी, श्रेयस तळपदे, तुषार कपूर, कुणाल खेमू हैदराबादला आले होते. चित्रपटाचे टायटल साँग बृजेश शांडिल्य यांने गायले आहे. या गाण्याचे बोल कुमारने लिहिले आहेत. एस.तमनने याला संगीत दिले आहे. रोहित शेट्टीने या गाण्याला खास बनवण्यासाठी कोणतीच कसर सोडली नाही. या गाण्यासाठी भव्य सेटदेखील उभारण्यात आला होता. या टायटल साँगमध्ये तब्बल 1000 डान्सर थिरकताना दिसणार आहेत. या गाण्याला गणेश आचार्यच्या कोरियोग्राफिने चार चाँद लावले आहेत.
ALSO READ : अंगावर शहारे आणणारा ‘बादशाहो’चा ट्रेलर ! एकदा पाहाच!
अजय देवगण सध्या एका मागोमाग एक धमाका करायला तयार आहे. रोहित शेट्टीच्या गोलमाल अगेननंतर तो 'सन्स ऑफ सरदार2' च्या तयारीला लागणार आहे. याशिवाय शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात तो तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारतो आहे. सूत्रांच्या माहितीनुसार तो 'शेर सिंग राणा' यांच्या बायोपिकमध्ये सुद्धा दिसण्याची शक्यता आहे. अजय देवगणच्या 'बादशाहो' सप्टेंबरमध्ये रिलीज होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला जे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. ट्रेलर जबरदस्त अॅक्शनने भरपूर आहे. मिलन लूथरियाने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात अजयसोबत इम्रान हाश्मी, विद्युत जामवाल, इलियाना डीक्रूझ आणि ईशा गुप्ता यांच्यादेखील भूमिका आहेत.