अजय देवगणची 'गोलमाल' सीरिज आता अ‍ॅनिमेशनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 06:00 IST2019-04-15T06:00:00+5:302019-04-15T06:00:00+5:30

गोलमाल फ्रँचायजी लवकरच निकलोडियन या लहान मुलांसाठीच्या भारतातील आघाडीच्या वाहिनीवर अ‍ॅनिमेशन स्वरुपात दिसणार आहे.

Ajay Devgan's 'Golmaal' series now in animation | अजय देवगणची 'गोलमाल' सीरिज आता अ‍ॅनिमेशनमध्ये

अजय देवगणची 'गोलमाल' सीरिज आता अ‍ॅनिमेशनमध्ये

रोहित शेट्टी दिग्दर्शित 'गोलमाल' फ्रॅंचाईजीने अजयला विनोदी अभिनेता म्हणून प्रस्थापित केले आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडले आहे. आता गोलमाल फ्रँचायजी लवकरच निकलोडियन या लहान मुलांसाठीच्या भारतातील आघाडीच्या वाहिनीवर अ‍ॅनिमेशन स्वरुपात दिसणार आहे.

 

मॅजिक टून, रुद्रा यानंतर निकलोडियन या भारतीय मुलांच्या आवडत्या वाहिनीने त्यांचा भारतातच बनलेला धमाल शो सादर केला. निकलोडियनच्या आगामी कार्यक्रमांमध्ये गोलमाल ज्युनिअरची भर करून या वाहिनीने विनोद, धमाल, मनोरंजक व हसवणारे अधिक चांगले, अधिक भव्य कार्यक्रम आणण्याचे आपले वचन पुन्हा एकदा पाळले आहे. 


'गोलमाल'च्या लोकप्रिय धमाल सिनेमांनी प्रौढांवर जादू केली आणि आता गोलमालची ज्युनिअर गँग लहान मुलांना हसवण्यास सज्ज आहे. गोलमाल ज्युनिअर दोन मस्तीखोर गँग्सना एकत्र आणणार आहे. या दोन्ही गँग्स खट्याळ आहेत, उत्साही आहेत पण एकमेकांपेक्षा अगदी वेगळ्या आहेत.

गोपाल, माधव, लक्ष्मण आणि लकी यांचे ज्युनिअर अवतार लहानग्यांना धमाल हसवण्यास सज्ज आहेत. त्यामुळे लक्ष्मण, गोपाल, माधव आणि लकीची प्रँक गँग गोलमाल ज्युनिअरमध्ये पहायला मिळणार आहे.


अजय देवगण लवकरच 'दे दे प्यार दे' चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट असून या चित्रपटाच्या ट्रेलरवरून हा चित्रपट प्रेक्षकांना खळखळून हसवणार असा अंदाज लावला जात आहे.

या चित्रपटात अजय देवगणसोबत तब्बू व रकुल प्रीत सिंग, जिमी शेरगिल व आलोकनाथ देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट १७ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Ajay Devgan's 'Golmaal' series now in animation