बाबो ! अमिताभ बच्चन यांच्या सिनेमाचे दिग्दर्शन करणार अजय देवगण, डिसेंबरपासून सुरु करणार शूटिंग
By गीतांजली | Updated: November 7, 2020 15:59 IST2020-11-07T15:55:06+5:302020-11-07T15:59:16+5:30
सुपरस्टार अमिताभ बच्चन अजय देवगण सोबत काम करणार आहेत.

बाबो ! अमिताभ बच्चन यांच्या सिनेमाचे दिग्दर्शन करणार अजय देवगण, डिसेंबरपासून सुरु करणार शूटिंग
कोरोना व्हायरसमुळे गेल्या अनेक दिवसांपासून थिएटरमध्ये एकही नवीन सिनेमा प्रदर्शित झालेला नाही, परंतु बॉलिवूडमध्ये अशा मोठ्या घोषणा केल्या जात आहेत की चाहते खूप उत्साही आहेत. बर्याच मोठे सेलेब्स सध्या त्यांच्या मेगा बजेट चित्रपटांवर काम करत आहेत. पुढच्या वर्षी प्रत्येकजण आपला चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी उत्सुक आहे. आता बातमी येत आहे की, सुपरस्टार अमिताभ बच्चनअजय देवगण सोबत काम करणार आहेत.
अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणार अजय
दिग्दर्शकांच्या खुर्चीवर बसून अजय देवगन पहिल्यांदाच अमिताभ बच्चन यांच्या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. फिल्म समीक्षक तरण अर्दश यांनी सोशल मीडियावर सांगितले आहे की, अजय देवगण त्याच्या आगामी चित्रपटाचे मेडे या सिनेमाचे शूटिंग सुरू करणार आहे. अजय देवगन सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत, त्याशिवाय ते या सिनेमात पायलटची भूमिका साकारताना दिसेल. ट्विटमध्ये लिहिले आहे की, अजय देवगन अमिताभ बच्चन यांना डायरेक्ट करणार आहेत. सिनेमाचे नाव मेडे आहे. अजय देवगन पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे. पूर्ण स्टारकास्ट अद्याप उघड झालेली नाही. सिनेमाचे शूटिंग डिसेंबरमध्ये सुरू होणार आहे.
अमिताभ यांच्या सिनेमाचे दिग्दर्शन करणार अजय देवगण
अजय देवगण मेडे सिनेमाविषयी खूप उत्साही दिसत आहे. तो या सिनेमाचे शूटिंग हैदराबादमध्ये करणार आहे. भुज दि प्राईड ऑफ इंडियाच्या शूटिंगनंतर अजय आपला नव्या प्रोजेक्टला सुरुवात करणार आहे. अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यासाठी अजय देवगण उत्सुक आहे. सिनेमाविषयी जास्त माहिती अद्यापसमोर आलेली नाही पण अमिताभ आणि अजय देवगण यांच्या जोडी पाहण्यासठी फॅन्स आतुर आहेत.