हनिमून सोडून पळून आला होता अजय देवगण, स्वत:च केला खुलासा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2018 18:19 IST2018-03-11T12:30:08+5:302018-03-11T18:19:51+5:30
अजय देवगण आणि त्याची पत्नी काजोल इंडस्ट्रीतील बेस्ट कपल्सपैकी एक आहेत. दोघांमध्ये जबरदस्त केमिस्ट्री असून, ती वेळोवेळी बघावयास मिळते.

हनिमून सोडून पळून आला होता अजय देवगण, स्वत:च केला खुलासा!
अ िनेता अजय देवगण सध्या त्याच्या आगामी ‘रेड’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्याचा हा चित्रपट १६ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अजयने चित्रपट आणि त्याच्या पर्सनल लाइफविषयी काही किस्से शेअर केले. त्याने सांगितले की, मी माझा हनिमून अर्ध्यातच सोडून पळून आलो होतो. मला हनिमूनसाठीच्या सुट्या जरा जास्तच वाटत होत्या, त्यामुळे मी पळून आलो होतो.
अजयने मुलाखतीदरम्यान सांगितले की, मी तर केवळ अर्ध्या तासातच लग्न उरकले होते. ते पण माझ्या घराच्या छतावर. रूमच्या बाहेर निघालो, लग्न केले अन् परत रूममध्ये गेलो. हनिमूनसाठी मी आणि काजोलने तब्बल दोन महिने सुट्या घेतल्या होत्या. परंतु मी माझ्या हनिमूनमधून एका महिन्यातच पळून आलो. वास्तविक दोन महिन्यांच्या सुट्या जरा जास्तच झाल्या होत्या.
पुढे बोलताना अजयने म्हटले की, बदलत्या वातावरणात मी स्वत:ला बदलू शकत नाही. वास्तविक त्याने स्वत:मध्ये बरेचसे बदल केले आहेत. याविषयी अजय सांगतो की, आता मी थोडेफार बोलतही आहे, जेणेकरून चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्याचा फायदा होईल. त्याने त्याच्या अपकमिंग प्रोजेक्टविषयी सांगितले की, मी एका कथेवर काम करीत आहे. ज्याचे डायरेक्शन मी स्वत: करणार आहे. ही कथा अन्य कथांच्या तुलनेत एकदम वेगळी आहे. वेळ आल्यानंतर मी यावर नक्कीच बोलणे पसंत करेल.
अजयच्या मते, एकसारख्या चित्रपटांमध्ये काम करणे त्याला आवडत नाही. अजय त्याच्या आगामी ‘रेड’ या चित्रपटात इन्कम टॅक्स आॅफिसरची भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे. हा चित्रपट लखनऊ बेस्ड असून, एका सत्य घटनेवर आधारित आहे. १९८१ मध्ये देशातील सर्वात मोठ्या हाय प्रोफाइल इन्कम टॅक्स रेडशी संबंधित चित्रपटाची कथा आहे. चित्रपटात इलियान डिक्रूज अजयसोबत स्क्रिन शेअर करीत आहे. सौरभ शुक्ला निगेटिव्ह भूमिकेत बघावयास मिळणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार गुप्ता यांनी केले आहे.