अजय देवगणची मेव्हणी तनिषा मुखर्जी बिकनीत दिसली बोल्ड आणि ग्लॅमरस, पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 13:16 IST2020-03-18T13:15:32+5:302020-03-18T13:16:14+5:30
तनिषा नुकतीच स्विमिंग पूलच्या किनारी बिकनीमध्ये एन्जॉय करताना दिसली.

अजय देवगणची मेव्हणी तनिषा मुखर्जी बिकनीत दिसली बोल्ड आणि ग्लॅमरस, पहा फोटो
अजय देवगणची मेव्हणी अभिनेत्री काजोलची बहिण तनिषा मुखर्जी बॉलिवूडमध्ये सक्रीय नाही. नुकतीच ती चर्चेत आली आहे तेही फोटोंमुळे. नुकतीच ती स्विमिंग पूलच्या किनारी बिकनीमध्ये एन्जॉय करताना दिसली. तिच्या बिकनीतील हॉट अदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
निळ्या रंगाच्या मोनोकिनीमध्ये तनिषा खूपच हॉट व बोल्ड अवतारात दिसते आहे. स्विमिंग पूलच्या किनारी तनिषा गर्ल गँगसोबत धमाल मस्ती करताना दिसते आहे. तिचे हे फोटो चाहत्यांना खूप भावत आहे. हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.
तनिषा सध्या बॉलिवूडमध्ये एक्टिव्ह नाही आहे, मात्र चाहत्यांमध्ये लाइमलाइटमध्ये राहणे तिला चांगल्यारित्या माहित आहे. ती इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत असते. तिच्या या फोटोंना खूप चांगला रिस्पॉन्स मिळत असतो.
तनिषा शेवटची 2016 साली रिलीज झालेल्या अन्ना चित्रपटात झळकली होती. तनिषा मुखर्जीने आजवर सरकार, नील अँड निक्की, टांगो चार्ली यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण तिला बॉलिवूडमध्ये तितकेसे यश मिळवता आले नाही.
बिग बॉस 7 या कार्यक्रमामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती.
या शोमध्ये तिचे अरमान मलिकसोबत असलेले अफेयर खूप चर्चेत आले होते. या रिलेशनमुळे तिला खूप ट्रोल केले गेले होते.