ऐश्वर्याचा मुलगा असा दावा करणाऱ्या ‘या’ तरुणाप्रमाणेच अभिषेकची पत्नी असल्याचा ‘या’ तरुणीने केला दावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 19:26 IST2018-01-04T13:55:04+5:302018-01-04T19:26:15+5:30

बच्चन परिवाराची सून आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. होय, आंध्र प्रदेशातील एका २९ वर्षीय ...

Aishwarya's son claims to be Abhishek's wife, just like the 'young' | ऐश्वर्याचा मुलगा असा दावा करणाऱ्या ‘या’ तरुणाप्रमाणेच अभिषेकची पत्नी असल्याचा ‘या’ तरुणीने केला दावा!

ऐश्वर्याचा मुलगा असा दावा करणाऱ्या ‘या’ तरुणाप्रमाणेच अभिषेकची पत्नी असल्याचा ‘या’ तरुणीने केला दावा!

्चन परिवाराची सून आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. होय, आंध्र प्रदेशातील एका २९ वर्षीय तरुणाने ती त्याची जन्मदात्री असल्याचा दावा केला आहे. संगीत कुमार असे नाव असलेला हा तरुण सध्या सर्वत्र ऐश्वर्याचा मुलगा असल्याचे सांगत फिरत आहे. संगीत कुमार याने केलेल्या दाव्यानुसार ऐश्वर्या रायने त्याला आयव्हीएफ तंत्रानुसार १९८८ साली लंडन येथे जन्म दिला. यावेळी त्याने ऐश्वर्या राय आणि तिच्या परिवाराविषयीदेखील काही खुलासे केले. वास्तविक अशाप्रकारचा दावा ऐश्वर्याबाबतच केला गेला असे नाही, तर तिचा पती अभिषेक बच्चन याच्याविषयीदेखील असाच दावा करण्यात आला आहे. 

होय, जान्हवी कपूर नावाच्या एका मॉडेलने २००७ साली अभिषेक बच्चनची पत्नी असल्याचे सांगत एकच गोंधळ घातला होता. हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर, त्या मॉडेलने अभिषेकसाठी स्वत:च्या हाताची नसही कापली होती. हा सर्व तमाशा तिने बच्चन यांच्या जुहू येथील बंगल्याबाहेर केला होता. ज्यामुळे एकच खळबळ उडाली होती. 



त्यावेळी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचे लग्न ठरले होते. मात्र जान्हवी नावाच्या या मॉडेलने मध्येच हा गोंधळ घातल्याने राय आणि बच्चन परिवाराला धक्का बसला होता. मॉडेलच्या मते, अभिषेक आणि ऐश्वर्याचे लग्न होताना मी बघू शकत नाही. त्यामुळे मी या जगाचा निरोप घेत आहे. जेव्हा तिने हा सर्व प्रकार केला तेव्हा पोलिसांनी तिला ताब्यात घेतले होते. 

आता ऐश्वर्यालादेखील अशाच प्रकारच्या त्रासाचा सामना करावा लागत असल्याने, हे प्रकरण काय वळण घेईल हे सांगणे मुश्किलच म्हणावे लागेल. कारण संगीत कुमार नावाचा हा तरुण सातत्याने मीडियामध्ये झळकत असून, तो ऐश्वर्याचा मुलगा असल्याचे सांगत आहे. मीडियाशी बोलताना या तरुणाने सांगितले की, २००७ साली माझ्या आईने अभिषेक बच्चन याच्याशी लग्न केले. आता ती तिच्यापासून विभक्त झाली असून, एकटी राहात आहे. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की, तिने माझ्याकडे मंगळुरू येथे राहण्यास यावे. गेल्या २७ वर्षांपासून मी माझ्या परिवारापासून दूर आहे. मी तिला खूप मिस करीत आहे. 

Web Title: Aishwarya's son claims to be Abhishek's wife, just like the 'young'