​ऐश्वर्याने दिला इम्रान हाश्मीसोबत काम करण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2016 15:40 IST2016-06-26T10:10:25+5:302016-06-26T15:40:25+5:30

हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या ऐश्वर्या राय-बच्चन जे स्थान एकेकाळी इंडस्ट्रीमध्ये होते ते सध्या ...

Aishwarya refuses to work with Imran Hashmi | ​ऐश्वर्याने दिला इम्रान हाश्मीसोबत काम करण्यास नकार

​ऐश्वर्याने दिला इम्रान हाश्मीसोबत काम करण्यास नकार

ंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या ऐश्वर्या राय-बच्चन जे स्थान एकेकाळी इंडस्ट्रीमध्ये होते ते सध्या नसले तरी तिची स्टार व्हॅल्यू कमी झालेले नाहीए.

म्हणून तर कोणासोबत काम करायचे आणि कोणा सोबत नाही हे तिच ठरवते.

अशी चर्चा आहे की, अजय देवगण स्टारर ‘बादशाहो’ चित्रपटासाठी दिग्दर्शक मिलन लुथ्रिया यांनी ऐशला काम करण्याची आॅफर दिली होती. ती उत्सुकदेखील होती.

परंतु दलजीत दोसांजने ऐनवेळी माघार घेतल्यामुळे त्याच्या जागी ‘सिरियल किसर’ इम्रान हाश्मीला कास्ट करण्यात आले. हे समजताच ऐशने मिलनला नकार कळवला.

आता इम्रानच्या इमेजमुळे तिने नकार दिला नाही तर करण जोहरच्या चॅट शोवर त्याने ऐश्वर्याला ‘प्लॅस्टिक ब्युटी’ म्हटले होते. याचा राग मनात ठेवून ऐश त्याच्याशी काम करू इच्छित नाही.

Web Title: Aishwarya refuses to work with Imran Hashmi