ऐश्वर्याने जया बच्चन यांच्या वाढदिवसाकडे केलं दुर्लक्ष? सासू-सूनेत बिनसल्याच्या चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 12:06 PM2024-04-10T12:06:48+5:302024-04-10T12:08:27+5:30

ऐश्वर्याचं सासू जया आणि नणंद श्वेताशी पटत नसल्याचं चित्र अनेकदा दिसून येत आहे.

Aishwarya Rai ignored Jaya Bachchan s birthday bachchan family dispute in talks | ऐश्वर्याने जया बच्चन यांच्या वाढदिवसाकडे केलं दुर्लक्ष? सासू-सूनेत बिनसल्याच्या चर्चांना उधाण

ऐश्वर्याने जया बच्चन यांच्या वाढदिवसाकडे केलं दुर्लक्ष? सासू-सूनेत बिनसल्याच्या चर्चांना उधाण

अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी काल वाढदिवस साजरा केला. संपूर्ण इंडस्ट्रीने त्यांना शुभेच्छा दिल्या. शिवाय पती अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि मुलगा अभिषेकनेही शुभेच्छापर पोस्ट शेअर केली. मात्र यामध्ये सून ऐश्वर्या रायने (Aishwarya Rai) सासूच्या वाढदिवसाकडे दुर्लक्ष केलं अशी चर्चा आहे. ऐश्वर्याने काल सासूच्या वाढदिवसानिमित्त एकही पोस्ट केली नाही. त्यामुळे बच्चन कुटुंबात फूट पडल्याचं पुन्हा ठळकपणे जाणवत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून बच्चन कुटुंब वेगळ्याच कारणांनी चर्चेत आहे. आदर्श सून म्हणून ओळखली जाणाऱ्या ऐश्वर्या राय बच्चनचं आता काहीतरी बिनसलं असल्याची चर्चा आहे. ऐश्वर्याचं सासू जया आणि नणंद श्वेताशी पटत नसल्याचं चित्र अनेकदा दिसून येत आहे. कधी अचानक सगळे एकत्र एखाद्या इव्हेंटमध्ये दिसतात तर कधी एकमेकांचं तोंडही पाहत नाहीत. काल जया बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वांनीच सोशल मीडिया पोस्ट करत त्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र सून ऐश्वर्याने काहीच पोस्ट केली नाही. इतर वेळी नवऱ्यासाठी, सासऱ्यांसाठी पोस्ट करणाऱ्या आवर्जुन पोस्ट करणाऱ्या ऐश्वर्याने सासूला मात्र शुभेच्छा दिल्या नाहीत यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.

मधल्या काळात अभिषेक-ऐश्वर्या घटस्फोट घेणार इथपर्यंत चर्चा झाल्या.  तर दुसरीकडे तेव्हाच अमिताभ बच्चन यांनी प्रतिक्षा हा बंगला लेकीच्या नावावर केला. आता ऐश्वर्या नवरा आणि मुलीला घेऊन वेगळी राहत आहे. पॅरिस फॅशन वीकमध्येही श्वेता नंदाच्या मुलीने नव्या नवेलीने पदार्पण केले. तिला पाठिंबा देण्यासाठी जया बच्चन आणि श्वेता पॅरिसमध्ये होत्या. तर ऐश्वर्याही त्याच शोचा भाग होती. मात्र परदेशात ऐश्वर्या आणि आराध्यासोबत जया बच्चन, श्वेता आणि नव्या तिघीही दिसल्या नाहीत. मात्र काही दिवसांपूर्वी अंबानींच्या पार्टीत सगळे एकत्र दिसले. त्यामुळे बच्चन कुटुंबात नक्की काय घडतंय हे अद्याप समोर आलेलं नाही. 

Web Title: Aishwarya Rai ignored Jaya Bachchan s birthday bachchan family dispute in talks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.