ऐश्वर्या राय बच्चन करतेय सिंगींग डेब्यू! या चित्रपटात गाणार गाणे!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2017 15:18 IST2017-06-29T09:48:36+5:302017-06-29T15:18:36+5:30
ऐश्वर्या राय ‘फन्ने खान ’ या चित्रपटासाठी जवळजवळ फायनल झाली आहे. होय, या चित्रपटात ऐश्वर्या व अनिल कपूर यांची ...

ऐश्वर्या राय बच्चन करतेय सिंगींग डेब्यू! या चित्रपटात गाणार गाणे!!
ऐ ्वर्या राय ‘फन्ने खान ’ या चित्रपटासाठी जवळजवळ फायनल झाली आहे. होय, या चित्रपटात ऐश्वर्या व अनिल कपूर यांची जोडी दिसणार आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा निर्मित या चित्रपटात अनिल कपूर एका गायकाच्या भूमिकेत आहे. पण खरी गायक ऐश्वर्या असणार आहे. नाही कळले ना? थांबा...थांबा...तीच तर बातमी आहे. होय, या चित्रपटात ऐश्वर्या गाणे गाणार आहे. होय, म्हणजेच ऐश्वर्या या चित्रपटातून सिंगींग डेब्यू करतेय.
ऐश्वर्या या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथम गाणार आहे आणि आम्हाला विश्वास आहे, ऐश्वर्या जे करणार ते सर्वोत्कृष्टचं असणार. कारण ऐश्वर्या मुळातच मल्टिटॅलेंटेड आहे. अनिल कपूर व ऐश्वर्या या दोघांनी याआधी ‘ताल’ व ‘हमारा दिल आपके पास है’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे.
यापूर्वी ऐश्वर्या ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये दिसली होती. त्याआधी ‘सरबजीत’मध्ये ती मुख्य भूमिकेत होती. आराध्याच्या जन्मानंतर ऐश्वर्या अगदी मोजक्याच चित्रपटात काम करणार आहे. माझी प्राथमिकता आराध्या आहे. त्यामुळे मी केवळ निवडकच स्क्रिप्ट स्वीकारणार,असे ऐश्वर्याने सांगून टाकले आहे.
‘फन्ने खान ’बद्दल बोलायचे झाल्यास, अतुल मांजरेकर या चित्रपटाचा दिग्दर्शक असेल. या चित्रपटाद्वारे अतुल मांजरेकर दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करतोय. या चित्रपटात अनिल कपूर एका सिंगरच्या पित्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. ऐश्वर्याची भूमिका काय असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही घोषणा लवकरच होईल, अशी अपेक्षा करूयात. कारण ‘ऐ दिल है मुश्किल’नंतर निश्चितपणे ऐश्वर्या रायला मोठ्या पडद्यावर पाहण्यास तिचे चाहते आतूर आहेत.