ऐश्वर्या राय बच्चनने नणंद श्वेता बच्चनमुळे ‘मिस’ केली फराह खानची बर्थ डे पार्टी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2018 15:41 IST2018-01-11T10:07:10+5:302018-01-11T15:41:42+5:30

बच्चन कुटुंब बॉलिवूडमधील सर्वाधिक प्रतिष्ठित आणि लोकप्रिय कुटुंब आहे, यात शंका नाही. साहजिक या कुटुंबात खट् झाले तरी त्याची ...

Aishwarya Rai Bachchan's 'Miss' Kelly Farah Khan's Birthday Party due to Nandan Shweta Bachchan? | ऐश्वर्या राय बच्चनने नणंद श्वेता बच्चनमुळे ‘मिस’ केली फराह खानची बर्थ डे पार्टी?

ऐश्वर्या राय बच्चनने नणंद श्वेता बच्चनमुळे ‘मिस’ केली फराह खानची बर्थ डे पार्टी?

्चन कुटुंब बॉलिवूडमधील सर्वाधिक प्रतिष्ठित आणि लोकप्रिय कुटुंब आहे, यात शंका नाही. साहजिक या कुटुंबात खट् झाले तरी त्याची बातमी होते. गेल्या काही दिवसांपासून बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय बच्चन हिच्याबद्दल अनेक चर्चा मीडियात येत आहेत. यातील सर्वाधिक ताजी बातमी म्हणजे, ऐश्वर्याचे सासू जया बच्चन आणि नणंद श्वेता बच्चन हिच्यासोबत बिघडलेले नाते. होय, ऐश्वर्याचे सासू व नणंदेसोबतचे संबंध फार चांगले नाहीत, असे अलीकडे ऐकू येतेय. गेल्या काही महिन्यांत विशेषत: ऐश्वर्या व श्वेता या दोघींमध्ये सगळे काही आॅल वेल नाही, याचे अनेक अप्रत्यक्ष पुरावे मिळत आहे. 



अलीकडे ऐश्वर्याने अभिनेत्री व दिग्दर्शिका फराह खान हिची बर्थ डे पार्टी मिस केली, यामागेही श्वेता बच्चन हेच कारण सांगितले जात आहे. चर्चा खरी मानाल तर,श्वेता या पार्टीला येणार असल्याचे कळल्यानेच ऐश्वर्याने या पार्टीला दांडी मारली. खरे तर श्वेतापेक्षा  ऐश्वर्याचा फराहसोबत अधिक चांगला बॉन्ड आहे.  पण तरीही तिने फराहची पार्टी मिस केली.



 अलीकडे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या दोघांच्या रिसेप्शनपार्टीतही श्वेता व ऐश्वर्या या दोघींमधील दुरावा स्पष्ट दिला होता. या पार्टीत ऐश्वर्या व श्वेता दोघीही हजर होत्या. पण दोघीही एकमेकांना टाळताना दिसल्या. या पार्टीतला एक फोटोही हेच सांगत होता. इतकेच नाही आराध्या बच्चनच्या वाढदिवसाच्या पार्टीतही आत्या श्वेता गैरहजर होती. त्यापूर्वी आराध्याच्या बर्थ डेच्या डिनर पार्टीतही श्वेता कुठेही नव्हती. आता या नणंद -भावजयीत नेमके काय सुरु आहे, ते आम्हाला ठाऊक नाही. पण काहीतरी बिनसलेयं, इतके मात्र खरे वाटतेय.

ALSO READ : ऐश्वर्या राय बच्चन बनणार का सरोगेट मदर?

लवकरच ऐश्वर्याचा ‘फन्ने खां’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘फन्ने खां’ एक म्युझिकल कॉमेडी चित्रपट असून, त्यामध्ये ऐश्वर्याबरोबर अनिल कपूर आणि राजकुमार राव यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाला अतुल मांजरेकर दिग्दर्शित करीत आहेत. ‘फन्ने खां’ आॅस्कर नॉमिनेटेड ‘एव्हरीबडी इज फेमस’ या डच चित्रपटाचा आॅफिशियल रिमेक आहे. अनिल कपूर आणि ऐश्वर्या राय तब्बल दोन दशकांनंतर एकत्र काम करीत आहेत. या चित्रपटात ऐश्वर्या एका गायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात 3 गाणी ऐश्वर्यावर चित्रीत करण्यात आली आहेत.  चित्रपटाच्या सुरुवातीलाच ऐश्वर्याची एंट्री एका डान्स साँगसोबत होणार आहे. 

Web Title: Aishwarya Rai Bachchan's 'Miss' Kelly Farah Khan's Birthday Party due to Nandan Shweta Bachchan?