आईसारखीच दिसते आराध्या! ऐश्वर्या राय बच्चनच्या बालपणीचा फोटो व्हायरल, चाहत्यांनी केली तुलना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 17:54 IST2025-05-28T17:52:59+5:302025-05-28T17:54:14+5:30
ऐश्वर्या राय बच्चनचा बालपणीचा एक दुर्मीळ फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

आईसारखीच दिसते आराध्या! ऐश्वर्या राय बच्चनच्या बालपणीचा फोटो व्हायरल, चाहत्यांनी केली तुलना
Aishwarya Rai Bachchan's Childhood: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची मुलगी आराध्या बच्चन यांचं नातं नेहमीच चर्चेचा विषय ठरतं. ऐश्वर्या जिथे जाईल तिथे आराध्याला हातात हात घालून घेऊन जाते. ऐश्वर्या आणि आराध्याचं बॉन्डिंग अनेकदा दिसून आलं आहे. अलीकडेच दोघी कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४ मध्ये एकत्र दिसल्या. अता अशातच ऐश्वर्या राय बच्चनचा बालपणीचा एक दुर्मीळ फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर अनेकांनी आराध्या ही आईसारखीच दिसते असं म्हटलं.
सध्या समोर आलेल्या या फोटोमध्ये ऐश्वर्या फ्लिक्स हेअरकटमध्ये दिसतेय आणि तिच्या डोक्यावर एक साधा हेअरबँड आहे. ऐश्वर्यानं हातात पेन्सिल घेऊन पोज दिलेली दिसतेय. हा फोटो पाहिल्यानंतर अनेक चाहत्यांना तिची मुलगी आराध्या आठवली. कारण आराध्या अगदी आपल्या आईसारखीच दिसते असं त्यांचं म्हणणं आहे. फेसकट, डोळे, केसांची स्टाईल सगळं काही अगदी सेम टू सेम. त्यामुळेच सोशल मीडियावर अनेकांनी "आराध्या म्हणजे ऐश्वर्याची सावली" असं म्हणत दोघींची तुलना केली आहे.
ऐश्वर्याने २० एप्रिल २००७ रोजी अभिनेता अभिषेक बच्चनसोबत लग्न केलं होतं. त्यानंतर १६ नोव्हेंबर २०११ रोजी तिने मुलगी आराध्याला जन्म दिला. ऐश्वर्या आपल्या मुलीवर खूप प्रेम करते. आराध्या सध्या धीरूबाई अंबानी शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण करत आहे. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी आराध्या परदेशात जाणार अशी देखील चर्चा आहे. सेलिब्रिटी किड म्हणून देखील आराध्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.