ऐश्वर्या रायने कुटुंबाच्या विरोधात जाऊन दिले होते ते बोल्ड सीन्स? मिळाले होते लीगल नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2021 08:00 IST2021-02-13T08:00:00+5:302021-02-13T08:00:02+5:30

‘धूम 2’ या सिनेमात ऐश्वर्याने हृतिक रोशनसोबत लिप-लॉक सीन दिला होता. हा सीन नंतर अनेक दिवस चर्चेत होता. अगदी आत्ताही त्या सीनची चर्चा होते.

aishwarya rai bachchan speaks about kissing scene in dhoom 2 with hrithik roshan | ऐश्वर्या रायने कुटुंबाच्या विरोधात जाऊन दिले होते ते बोल्ड सीन्स? मिळाले होते लीगल नोटीस

ऐश्वर्या रायने कुटुंबाच्या विरोधात जाऊन दिले होते ते बोल्ड सीन्स? मिळाले होते लीगल नोटीस

ठळक मुद्देपुढे अनेक वर्षानंतर ‘ऐ दिल है मुश्किल’ या सिनेमातही ऐश्वर्याने रणबीर कपूरसोबत बोल्ड सीन्स दिलेत. त्याहीवेळी बच्चन कुटुंब या सीन्सवर नाराज असल्याच्या बातम्या आल्या होत्या.

बॉलिवूडमध्ये आताश: किसींग सीन्स, बोल्ड सीन्स सामान्य बाब झालीये. पण अद्यापही अशा सीन्सला नकार देणारेही काही स्टार्स आहेत. ऐश्वर्या राय सुद्धा त्यापैकीच एक. इंटिमेट सीन्सपासून ती कायम अंतर ठेवते. अर्थात काही सिनेमात तिनेही बोल्ड सीन्स दिले आहेत. ‘धूम 2’ असाच एक सिनेमा. या सिनेमात ऐश्वर्याने हृतिक रोशनसोबत लिप-लॉक सीन दिला होता. हा सीन नंतर अनेक दिवस चर्चेत होता. अगदी आत्ताही त्या सीनची चर्चा होते. कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल, पण हा सीन देताना ऐश्वर्या स्वत: कम्फर्टेबल नव्हती.

2006 साली ‘धूम 2’ रिलीज झाला होता. या सिनेमातील तिच्या बोल्ड सीन्सनंतर बच्चन कुटुंब अर्थात ऐश्वर्याच्या होणा-या सासरचे मंडळी नाराज असल्याच्या बातम्या तेव्हा चर्चेत होत्या. 2006 साली ऐश्वर्या व अभिषेक बच्चन यांच्या लग्नाच्या चर्चा सुरु होत्या. या सिनेमाच्या रिलीजनंतर 2007 साली अभिषेक व ऐश्वर्याचे लग्न झाले होते. चर्चा खरी मानाल तर, बच्चन कुटुंबाने ऐश्वर्याला किसींग सीन्स देण्यास मनाई केली होती. पण 2002 मध्ये रिलीज झालेल्या ‘देवदास’नंतर ऐश्वर्याच्या नावावर सलग 5 फ्लॉप सिनेमे जमा होते. त्यामुळे ‘धूम 2’ कडून तिला प्रचंड अपेक्षा होत्या. करिअरला गती देण्यासाठीच ऐश्वर्या यात बोल्ड सीन्स द्यायला तयार झाली होती. मात्र बच्चन कुटुंब तिच्या या निर्णयावर फार खूश नव्हते. रिपोर्टनुसार, याच कारणामुळे ‘धूम 2’च्या प्रीमिअरला बच्चन कुटुंब हजर नव्हते.

या सिनेमामुळे केवळ बच्चन कुटुंबाचीच नाही तर काही चाहत्यांची नाराजीही ऐश्वर्याला सहन करावी लागली होती. हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर तिला लीगल नोटीसही पाठवण्यात आले होते.
एका मुलाखतीत खुद्द ऐश्वर्याने ‘धूम 2’मधील बोल्ड सीन्स देताना ती कम्फर्टेबल नव्हती, असे म्हटले होते.

पुढे अनेक वर्षानंतर ‘ऐ दिल है मुश्किल’ या सिनेमातही ऐश्वर्याने रणबीर कपूरसोबत बोल्ड सीन्स दिलेत. त्याहीवेळी बच्चन कुटुंब या सीन्सवर नाराज असल्याच्या बातम्या आल्या होत्या. अमिताभ यांनी तर करण जोहरला हे सीन्स डिलीट करण्याची विनंती केल्याचीही चर्चा होती. अर्थात बच्चन कुटुंब व ऐश्वर्याने यावर मौन बाळगणे पसंत केले होते.

Web Title: aishwarya rai bachchan speaks about kissing scene in dhoom 2 with hrithik roshan