'पोन्नियन सेल्वन'साठी फॅन्सकडून मिळालेलं प्रेम पाहून भारावली Aishwarya Rai Bachchan, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 11:22 AM2022-09-26T11:22:55+5:302022-09-26T11:23:32+5:30

Aishwarya Rai Bachchan: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा बहुप्रतिक्षीत चित्रपट पोन्नियन सेल्वन १ उर्फ PS:I ३० सप्टेंबरला रिलीज होणार आहे.

Aishwarya Rai Bachchan overwhelmed with love from fans for 'Ponniyan Selvan', says... | 'पोन्नियन सेल्वन'साठी फॅन्सकडून मिळालेलं प्रेम पाहून भारावली Aishwarya Rai Bachchan, म्हणाली...

'पोन्नियन सेल्वन'साठी फॅन्सकडून मिळालेलं प्रेम पाहून भारावली Aishwarya Rai Bachchan, म्हणाली...

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन(Aishwarya Rai Bachchan)चा बहुप्रतिक्षीत चित्रपट पोन्नियन सेल्वन १ (Ponniyin Selvan 1) उर्फ PS:I ३० सप्टेंबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या बाबतीत अभिनेत्री खूपच उत्सुक आहे. या चित्रपटातून ऐश्वर्या राय बच्चन जवळपास ४ वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक करते आहे. ऐश्वर्याप्रमाणे तिचे चाहतेदेखील तिला मोठ्या स्क्रीनवर पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. पोन्नियन सेल्वनसाठी फॅन्सकडून मिळालेलं प्रेम पाहून ऐश्वर्या भारावून गेली आहे आणि तिने इंस्टाग्रामवर तिचा सुंदर फोटो शेअर करून चाहत्यांचे आभार मानले आहेत.

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने रविवारी इंस्टाग्रामवर सुंदर स्मितहास्य असलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिने क्रिम आणि गोल्डन रंगाचा आउटफिट परिधान केला आहे. तिने फोटो शेअर करत लिहिले की, तुमच्या प्रेमासाठी आणि आशीर्वादांबद्दल सर्वांचे आभार...  सदैव खूप प्रेम. ऐश्वर्याच्या या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.


ऐश्वर्याच्या या पोस्टवर अभिनेत्री नीना गुप्ता यांनी लिहिले की, तू खूप सुंदर दिसते आहेस. रिद्धीमा पंडितनं म्हटलं की, संपूर्ण जगातील सर्वात सुंदर महिला. तर एका चाहत्याने म्हटले, खरंच मॅम तुम्ही आताही खूप सुंदर आहात आणि नेहमी राणीसारख्या राहाल. दुसऱ्या एका युजरने लिहिले की, वाह..! ऐश्वर्या तुझे आभार. तुझ्या अस्तित्वासाठी आणि तू आहेस आणि तूझ्याकडून आम्हाला खूप काही शिकायला मिळतं!. आणखी एकाने कमेंट केली की, मोठ्या पडद्यावर पोन्नियिन सेल्वन या महाकाव्यातील सर्वात महत्त्वाचे पात्र साकारताना पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही.


ऐश्वर्या राय बच्चनचा आगामी चित्रपट पोन्नियिन सेल्वन १ सप्टेंबर 30 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. मणिरत्नमचा हा चित्रपट दोन भागात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ऐश्वर्याशिवाय त्रिशा कृष्णन, विक्रम, जयराम रवी, कार्ती हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तमिळ, तेलगू, हिंदीसह कन्नड आणि मल्याळम भाषांमध्येही हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

Web Title: Aishwarya Rai Bachchan overwhelmed with love from fans for 'Ponniyan Selvan', says...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.