​ऐश्वर्या राय बच्चनने का केले मुंडण? जाणून घ्या या प्रश्नाचे उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 10:33 IST2017-09-01T05:03:19+5:302017-09-01T10:33:19+5:30

अंगावर भगवे उपरणे, माथ्यावर टिळा आणि केसांचे टक्कल, होय, अशाच रूपातील ऐश्वर्या राय बच्चनचा फोटो काही दिवसांपासून  फोटो व्हायरल ...

Aishwarya Rai Bachchan kaunya kaun Mundan? Know the answer to this question! | ​ऐश्वर्या राय बच्चनने का केले मुंडण? जाणून घ्या या प्रश्नाचे उत्तर!

​ऐश्वर्या राय बच्चनने का केले मुंडण? जाणून घ्या या प्रश्नाचे उत्तर!

गावर भगवे उपरणे, माथ्यावर टिळा आणि केसांचे टक्कल, होय, अशाच रूपातील ऐश्वर्या राय बच्चनचा फोटो काही दिवसांपासून  फोटो व्हायरल होतो आहे.



‘ प्रत्येकवेळी सुंदर दिसणे हेच खरे सौंदर्य आहे. परमेश्वराचरणी हे सौंदर्य अर्पण करणे आणखीच सुंदर आहे. परमेश्वरासमोर जगातील सर्वाधिक सुंदर महिला असो वा एखादी सामान्य वृद्ध महिला,सगळेच समान आहेत. ऐश्वर्याने तिने केस प्रसिद्ध तिरूमला मंदिरात दान केले,’असे कॅप्शन या फोटोला दिले गेले आहे. आता ऐश्वर्या खरोखरीचं तिरूपतीला गेली वा नाही, शेवटी हा संशोधनाचाच विषय होताच. मग काय, या फोटोची पडताळणी करणे आलेच. आम्ही ती केली आणि गेल्या काही दिवसांत व्हायरल होत असलेल्या अनेक सेलिब्रिटींच्या फोटोंप्रमाणे हा फोटोही फोटोशॉपचा उत्तम नमुना असल्याचे समोर आले. होय, ऐश्वर्याचा जुना फोटो फोटोशॉपच्या मदतीने मॉर्फ करून तो व्हायरल केल्या जात आहे.  



तसेही ऐश्वर्यासाठी अफवा नव्या नाहीत. तिच्याबद्दल अनेक अफवा याआधी पसरलेल्या आपण पाहिल्या आहेत. यात ऐश्वर्याने आत्महत्या केल्याची एक अफवाही होती. ‘आऊटलूक पाकिस्तान’ नामक संकेतस्थळावरून ऐश्वर्याच्या आत्महत्येची बातमी व्हायरल झाली होती.



ऐश्वर्याने ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटात रणबीर कपूरसोबत बोल्ड सीन्स दिल्यामुळे बच्चन कुटुंब नाराज आहे. त्यामुळे ऐश्वर्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे यात म्हटले गेले होते. अर्थात ही निव्वळ एक अफवा होती.



याशिवाय ऐश्वर्याने एका मुलीला दत्तक घेतल्याचा फोटोही व्हारयल झाला होता. तो फोटोही बनावट होता.
एकंदर काय तर अफवा आणि ऐश्वर्याचे जुने नाते आहे. तिच्याबद्दल कायम वेगवेगळ्या अफवा उडत असतात. अर्थात ऐश्वर्या या गोष्टी कधीच मनावर घेत नाही.
 

Web Title: Aishwarya Rai Bachchan kaunya kaun Mundan? Know the answer to this question!