ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 16:39 IST2025-09-29T16:39:30+5:302025-09-29T16:39:52+5:30
ऐश्वर्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय

ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
'विश्वसुंदरी' ऐश्वर्या रायची जादू आजही कायम आहे. सुंदर रुप, निळ्या डोळ्यांनी ती आजही चाहत्यांना प्रेमात पाडते. अनेक वर्षांपासून तिचे चाहते तिच्यासाठी आजही तितकेच प्रामाणिक आहेत. नुकतीच ऐश्वर्या लेक आराध्यासह पॅरिसमध्ये दिसली. 'पॅरिस फॅशन वीक'साठी ऐश्वर्या त्या ठिकाणी पोहोचली आहे. दरम्यान ऐश्वर्या हॉटेलमधून बाहेर आली असता काही चाहते तिची झळक पाहण्यासाठी उभे होते. यातील एका चाहतीला तर ऐश्वर्याला पाहून थेट रडूच कोसळलं. ऐश्वर्यानेही तिला घट्ट मिठी मारली. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या आणि आराध्या एका इमारतीतून बाहेर पडत आहेत. बाहेर काही पापाराझी आणि चाहतेही जमलेले आहेत. ऐश्वर्या बाहेर आली तेव्हा एक चाहती तिला रडताना दिसली. ऐश्वर्या लगेच सुरक्षारक्षकांना बाजूला सारत त्या चाहतीजवळ गेली. तिचे डोळे पुसले, तिची गळाभेट घेतली. फोटोही काढला. तिच्याशी छान बोलली. तोवर आराध्या कारमध्ये जाऊन बसली होती. ऐश्वर्याचा हा व्हिडिओ व्हायरल होत असून तिच्या स्वभावाचं कौतुकही होत आहे.
ऐश्वर्या कायमच आपल्या चाहत्यांसोबत मनमोकळेपणाने वागते. मग भारतात असो किंवा परदेशात ती चाहत्यांना वेळ देते. दरवर्षीप्रमाणेच यंदाही ऐश्वर्या पॅरिस फॅशन वीकमध्ये आपला जलवा दाखवणार आहे. तसंच तिचं वजनही आधीपेक्षा काही प्रमाणात घटलेलं दिसत आहे. 'फॅशन वीक'मधील ऐश्वर्याचा लूक पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.