अंबानींच्या घरी सिंपल लूकमध्ये दिसली ऐश्वर्या, मिस वर्ल्डचा अवतार पाहून नेटकरीही चक्रावले, म्हणाले, "तुला फॅशन..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 10:50 IST2023-09-20T10:47:34+5:302023-09-20T10:50:41+5:30

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चननेही लेक आराध्यासह अंबानींच्या घरी गणपती दर्शनाला हजेरी लावली होती. 

aishwarya rai bachchan gets troll for simple look in mukesh ambani ganesh darshan party video viral | अंबानींच्या घरी सिंपल लूकमध्ये दिसली ऐश्वर्या, मिस वर्ल्डचा अवतार पाहून नेटकरीही चक्रावले, म्हणाले, "तुला फॅशन..."

अंबानींच्या घरी सिंपल लूकमध्ये दिसली ऐश्वर्या, मिस वर्ल्डचा अवतार पाहून नेटकरीही चक्रावले, म्हणाले, "तुला फॅशन..."

देशात सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. अनेक बॉलिवू़ड सेलिब्रिटींच्या घरीही बाप्पा विराजमान झाले आहेत. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींच्या घरीही लाडक्या बाप्पाचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. अंबानींच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी बॉलिवूडमधील अनेक सिताऱ्यांनी हजेरी लावली होती. बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चननेही लेक आराध्यासह अंबानींच्या घरी गणपती दर्शनाला हजेरी लावली होती. 

ऐश्वर्याने यावेळी पंजाबी ड्रेस परिधान करत साधा लूक केला होता. ऐश्वर्याची लेक आराध्यानेही आईप्रमाणेच पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये पारंपरिक लूक केला होता. पण मिस वर्ल्डचा साधा लूक पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत. काहींनी ऐश्वर्याला ट्रोल केलं आहे. तर अनेकांनी तिला फॅशन स्टायलिशची गरज असल्याचं म्हटलं आहे. विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजवरुन ऐश्वर्या आणि आराध्याचा अंबानींच्या घरातील दर्शनावेळीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. 

एकाने कमेंट करत "हिला स्टायलिस्टची गरज आहे," असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने "मिस वर्ल्ड होती. काय हालत केली आहे," अशी कमेंटही केली आहे. अनेकांनी ऐश्वर्याच्या या लूकचं कौतुकही केलं आहे. "फक्त ऐश्वर्याने व्यवस्थित ड्रेसिंग केलं आहे. बाकी सगळे तर फॅशन शोला आले आहेत," असं एकाने म्हटलं आहे. 

दरम्यान, ऐश्वर्याने २००७साली बॉलिवू़ड अभिनेता अभिषेक बच्चनबरोबर लग्नगाठ बांधली. लग्नानंतर चार वर्षांनी तिने आराध्या या तिच्या मुलीला जन्म दिला. लग्नानंतर काही काळ ऐश्वर्या मनोरंजनविश्वापासून लांब होती. त्यानंतर तिने पुन्हा दमदार कमबॅक केलं. 

Web Title: aishwarya rai bachchan gets troll for simple look in mukesh ambani ganesh darshan party video viral