Video: ५१ वर्षांच्या ऐश्वर्या राय बच्चनने 'पॅरिस फॅशन वीक'मध्ये लुटली मैफिल; सौंदर्याची सर्वांंना भुरळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 13:31 IST2025-09-30T13:31:07+5:302025-09-30T13:31:40+5:30

ऐश्वर्या राय बच्चनने पॅरिस फॅशन वीकमध्ये रँप वॉक करुन सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. व्हिडीओ पाहताच तुम्हीही ऐश्वर्याच्या प्रेमात पडाल

aishwarya rai bachchan at paris fashion week ramp walk video viral with aaryadhya bachchan | Video: ५१ वर्षांच्या ऐश्वर्या राय बच्चनने 'पॅरिस फॅशन वीक'मध्ये लुटली मैफिल; सौंदर्याची सर्वांंना भुरळ

Video: ५१ वर्षांच्या ऐश्वर्या राय बच्चनने 'पॅरिस फॅशन वीक'मध्ये लुटली मैफिल; सौंदर्याची सर्वांंना भुरळ

'ग्लोबल आयकॉन' आणि सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने (Aishwarya Rai Bachchan) पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर तिची जादू दाखवली आहे. पॅरिसफॅशन वीकमध्ये (Paris Fashion Week) एका लोकप्रिय ब्रँडचं प्रतिनिधित्व करताना ऐश्वर्याने रॅम्पवर वॉक करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तिच्या आकर्षक लूक आणि दिलखेचक अदांनी तिने पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने पॅरिसफॅशन वीकमध्ये मैफिल लुटली आहे.

ऐश्वर्याचा 'ग्लॅमरस' अवतार

पॅरिस फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉकसाठी ऐश्वर्याने काळ्या रंगाचे अत्यंत मोहक कपडे परिधान केले होते. या पोशाखाची खास गोष्ट म्हणजे त्यावर हिऱ्यांनी जडवलेल्या स्लीव्हस् आणि मागील बाजूस सुंदर नक्षीकाम केलेलं होतं. या रॉयल लूकला अधिक खास बनवण्यासाठी ऐश्वर्याने क्लासिक लाल लिपस्टिकचा बोल्ड टच दिला होता. हा संपूर्ण लूक शाही आणि फॅशनेबल दिसत होता. उपस्थितांनी टाळ्या वाजवत ऐश्वर्याच्या लूकला पसंती दिली.


 ५१ वर्षांच्या ऐश्वर्याने रॅम्पवर पूर्ण आत्मविश्वास आणि उत्साहाने वॉक केला. वॉक संपल्यावर तिने उपस्थित प्रेक्षक आणि चाहत्यांना हात जोडून 'नमस्ते' केलं. ऐश्वर्याने हावभावात भारतीयपण जपल्याने तिने उपस्थितांची मनं जिंकली. पुढे फ्लाईंग किस करुन ऐश्वर्याने तिच्या सौंदर्याने आणि ग्लॅमरस अदांनी सर्वांना मोहून टाकलं. 

या खास पॅरिस ट्रिपमध्ये ऐश्वर्याची मुलगी आराध्या बच्चन तिच्यासोबत होती. एका व्हिडिओमध्ये आराध्या तिच्या आईच्या मागे चालून तिची साथ देताना दिसली. ज्यामुळे माय-लेकीच्या नात्याची बॉन्डिंग दिसून आली. रॅम्प वॉकनंतर ऐश्वर्या अनेक आंतरराष्ट्रीय सुपरमॉडेल्स आणि अभिनेत्रींसोबत स्टेजवर आली. तिने हेइडी क्लम (Heidi Klum) आणि तिची जुनी मैत्रीण ईवा लोंगोरिया (Eva Longoria) यांच्याशी भेटून गप्पा मारल्या आणि फोटो काढले. 

Web Title : 51 साल की ऐश्वर्या राय बच्चन ने पेरिस फैशन वीक में बिखेरा जलवा

Web Summary : ऐश्वर्या राय बच्चन ने पेरिस फैशन वीक में रैंप पर जलवा बिखेरा। उन्होंने डायमंड स्लीव्स वाली एक शानदार काली पोशाक पहनी थी, जिसने सभी को मंत्रमुग्ध कर दिया। उनकी बेटी आराध्या भी उनके साथ थीं। ऐश्वर्या ने 'नमस्ते' से दर्शकों का अभिवादन किया।

Web Title : Aishwarya Rai Bachchan Stuns at Paris Fashion Week at 51

Web Summary : Aishwarya Rai Bachchan captivated Paris Fashion Week, representing a brand on the runway. She wore a stunning black dress with diamond sleeves, leaving everyone mesmerized. Her daughter, Aaradhya, accompanied her on the trip. She greeted the audience with a 'Namaste'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.