ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चनचा हा फोटो पाहून चाहते झाले खुश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 14:24 IST2017-11-13T06:04:39+5:302018-04-03T14:24:07+5:30

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचा असाच एक फोटो समोर आला आहे की ज्यामध्ये त्या दोघांची बॉंडींग दिसून ...

Aishwarya Rai Bachchan and Abhishek Bachchan got this photo looking at the picture | ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चनचा हा फोटो पाहून चाहते झाले खुश

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चनचा हा फोटो पाहून चाहते झाले खुश

िषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचा असाच एक फोटो समोर आला आहे की ज्यामध्ये त्या दोघांची बॉंडींग दिसून येते. तसेही यात शंकाच नाही की अभिषेकआणि ऐश्वर्या बॉलिवूडमध्ये सर्वात प्रसिद्ध कपल पैकी. आहे एक आहे. त्यांच्या लग्नाला कित्येक वर्षे झाली तरीसुद्धा त्यांची केमिस्ट्री बघून असे कधी वाटत नाही. जेव्हा ते एकत्र जातात तेव्हा सगळ्यांची नजर त्या दोघांवर असते. अभिषेक आणि ऐश्वर्या काही दिवसांपूर्वी एका लग्नात गेले होते त्यानी तिथे संधी साधून स्वतःचे एकत्र फोटो काढून घेतले. 
अभिषेकने यात  निळा रंगाचा कुर्ता घातला होता आणि ऐश्वर्याने लाल रंगाचा लेहंगा परिधान केला होता. दोघे ही यात फार सुंदर दिसतायेत. हे फोटो इन्स्टाग्रामवर चांगलाच व्हायरल झाला आहेत.

काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत ऐश्वर्याविषयी बोलताना अभिषेक म्हणाला, “आई झाल्यानंतर ऐश्वर्याने कौटुंबिक जबाबदारीला पहिले प्राधान्य दिले आणि यासाठी तिने स्वत:चे करिअरदेखील बाजूला ठेवले. आराध्याच्या जन्मानंतर ऐश्वर्याचे स्थूल शरीराविषयी अनेक चर्चा रंगल्या. काही विचित्र प्रतिक्रियाही त्या दरम्यान कानावर आल्या यामुळे मी दुखावलो गेलो होतो.''  

पुढे अभिषेक म्हणाला,'' मात्र यावर ऐश्वर्याने कधीच तक्रार केली नाही, कधीही या गोष्टींकडे लक्ष देत जीममध्ये जाऊन वर्कआऊट करण्यात वेळ घालवला नाही. मी दुखावलो गेलो आहे हे पाहुन तिने मला धीर दिला.''

ऐश्वर्या लवकरच चित्रपट फन्ने खानमध्ये झळकणार आहे  फन्ने खानमध्ये ऐश्वर्या रायच्या एका रॉकस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात 3 गाणी ऐश्वर्यावर चित्रीत करण्यात आली आहेत. चित्रपटाच्या सुरुवातीलाच ऐश्वर्याची एंट्री एका डान्स साँगसोबत होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार क्रेजी किया रे असे आहेत. यानंतर दुसऱ्या गाण्यात ऐश्वर्या अभिनेता राजकुमार रावसोबत रोमांस करताना दिसणार आहे. ज्याची शूटिंग मुंबईत होणार आहे, तर तिसऱ्या गाण्यात ऐश्वर्या चित्रपटातील मुख्य अभिनेता अनिल कपूरसोबत दिसणार आहे. हे एक इमोशन गाणं असेल. 

Web Title: Aishwarya Rai Bachchan and Abhishek Bachchan got this photo looking at the picture