'या'च्यामुळे ऐश्वर्या राय आणि मनिषा कोईरालामध्ये झाले होते भांडण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2017 12:13 IST2017-06-05T06:43:32+5:302017-06-05T12:13:32+5:30
ऐश्वर्या राय आणि मनिषा कोईराला या दोघी नव्वदीच्या दशकातील अभिनेत्री आहेत. पण त्या दोघींनी कधीच एकमेकींसोबत काम केले नाही. ...

'या'च्यामुळे ऐश्वर्या राय आणि मनिषा कोईरालामध्ये झाले होते भांडण
ऐ ्वर्या राय आणि मनिषा कोईराला या दोघी नव्वदीच्या दशकातील अभिनेत्री आहेत. पण त्या दोघींनी कधीच एकमेकींसोबत काम केले नाही. ऐश्वर्या आणि मनिषाने एकत्र काम न करण्याचे एक खास कारण आहे. एकेकाळी ऐश्वर्या आणि मनिषा हे एकाच पुरुषाच्या प्रेमात पडले असल्याने त्या दोघांनी एकमेकांपासून दूर राहाणेच पसंत केले होते.
ऐश्वर्या राय चित्रपटसृष्टीत आली, त्यावेळी मनिषा कोईराला एक प्रस्थापित अभिनेत्री होती. तिचे अनेक चित्रपट हिट झाले होते. ऐश्वर्याने देखील चित्रपटसृष्टीत एंट्री करताच काहीच वर्षांत आपले एक वेगळे प्रस्थ निर्माण केले. ऐश्वर्या देखील एक आघाडीची अभिनेत्री बनली. पण असे असले तरी त्या दोघी कधीच कोणत्या चित्रपटात एकत्र झळकल्या नाहीत. या मागे कारण होते. राजीव मुलचंदानी.
ऐश्वर्या आज बच्चन कुटुंबाची सून आहे. तिने काही वर्षांपूर्वी अभिषेक बच्चनसोबत लग्न केले. आज त्या दोघांना आराध्या ही मुलगी देखील आहे. पण अभिषेकसोबत लग्न करण्याआधी ऐश्वर्या रायचे सलमान खान, विवेक ऑबेरॉय यांच्यासोबतच प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते. सलमान खान आणि ऐश्वर्या यांच्या प्रेमप्रकरणाच्या बातम्या तर आजही लोकांच्या मनात ताज्या आहेत.
ऐश्वर्या राय इंडस्ट्रीत येण्याआधी तिचे प्रेमप्रकरण राजीव मुलचंदानीसोबत सुरू होते. ऐश्वर्या मॉडलिंग करत असताना त्या दोघांची ओळख झाली होती. 1994मध्ये मनिषाने दिलेल्या एका मुलाखतीत तिने म्हटले होते की, राजीव मुलचंदानी याने मनिषासाठी ऐश्वर्याला सोडले होते. मनिषाने मीडियाला अशाप्रकारे मुलाखत देणे ऐश्वर्याला पटले नव्हते आणि त्यामुळे त्या दोघांचे एकमेकींशी कधीच पटले नाही.
![aishwarya rai rajeev mulchandani]()