मुंबईतल्या या टॉप शाळेत शिकतेय ऐश्वर्या-अभिषेकची लाडकी लेक आराध्या बच्चन, एका महिन्याची फी वाचून व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 15:12 IST2023-10-30T15:10:50+5:302023-10-30T15:12:54+5:30
Aaradhya Bachchan : ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन मुंबईतील एका टॉप स्कूलमध्ये शिकते, या शाळेची फी जाणून तुम्हाला धक्का बसेल.

मुंबईतल्या या टॉप शाळेत शिकतेय ऐश्वर्या-अभिषेकची लाडकी लेक आराध्या बच्चन, एका महिन्याची फी वाचून व्हाल थक्क
बॉलिवूड स्टार ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांची मुलगी आराध्या बच्चन (Aaradhya Bachchan) अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असते. आराध्या ही देखील लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. ती नेहमीच तिची आई ऐश्वर्यासोबत दिसते. आराध्या ही एका प्रसिद्ध बॉलिवूड घराण्याची मुलगी आहे, त्यामुळे ती कोणत्या वर्गात आणि कोणत्या शाळेत शिकते हे प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे.
ऐश्वर्या आणि अभिषेकची लाडकी लेक आराध्या मुंबईच्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकते. या शाळेत अनेक स्टार मुले शिकतात आणि अनेक उत्तीर्ण झाले आहेत. आराध्याही याच शाळेची विद्यार्थिनी आहे. आराध्या या शाळेत नर्सरीपासून शिकत आहे. सध्या ती आठवीत शिकत आहे. या शाळेची फी खूप जास्त आहे. तिच्या शाळेची फी वाचून तुम्ही थक्क व्हाल. एका मीडिया रिपोर्टनुसार, आराध्या सध्या आठवीची विद्यार्थिनी आहे, त्यामुळे तिची दरमहा फी ४.५ लाख रुपये आहे.
आराध्याची मासिक फी इतकी आहे
या शाळेची नर्सरी ते ७ वी पर्यंतची मासिक फी अंदाजे १.७० लाख रुपये आहे. त्याच वेळी, हायस्कूलची ८ वी पासूनची फी दरमहा सुमारे ४.५ लाख रुपये आहे. त्याप्रमाणे आराध्या सध्या ८वी इयत्तेत आहे आणि तिची मासिक फी ४.५ लाख रुपये आहे.
आराध्या बच्चन अनेकदा ट्रोल झाली आहे
आराध्या तिची आई ऐश्वर्याच्या खूप जवळ आहे. प्रत्येक फंक्शनमध्ये ती नेहमी आईसोबत दिसते. चाहत्यांनाही ऐश्वर्याची मुलगी खूप आवडते. यासोबतच चाहते ऐश्वर्याच्या संगोपनाचे खूप कौतुक करतात. मात्र, असे अनेक प्रसंग आले आहेत जेव्हा आराध्याला तिच्या हेअरस्टाइलमुळे ट्रोल करण्यात आले आहे.