राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी 2’मधून होणार ‘या’ हँडसम स्टारकिडचा बॉलिवूड डेब्यू!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 06:00 IST2019-03-27T06:00:00+5:302019-03-27T06:00:02+5:30

बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे याचा पुतण्या अहान पांडे याचा बॉलिवूड डेब्यू अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अहानने एका मोठ्या प्रॉडक्शन हाऊसचे तीन सिनेमे साईन केल्याची बातमी सुमारे दोन वर्षांपूर्वी आली होती. अर्थात ही बातमी अफवा निघाली. पण आता एक ताजी बातमी खरी मानाल तर अहानला एक मोठा ब्रेक मिळाला आहे.

Ahaan Panday to make his Bollywood debut with Rani Mukerji's Mardaani 2? | राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी 2’मधून होणार ‘या’ हँडसम स्टारकिडचा बॉलिवूड डेब्यू!!

राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी 2’मधून होणार ‘या’ हँडसम स्टारकिडचा बॉलिवूड डेब्यू!!

बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे याचा पुतण्या अहान पांडे याचा बॉलिवूड डेब्यू अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अहानने एका मोठ्या प्रॉडक्शन हाऊसचे तीन सिनेमे साईन केल्याची बातमी सुमारे दोन वर्षांपूर्वी आली होती. अर्थात ही बातमी अफवा निघाली. पण आता एक ताजी बातमी खरी मानाल तर अहानला एक मोठा ब्रेक मिळाला आहे.
होय, मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, अहान पांडे एका मोठ्या प्रॉडक्शन हाऊसच्या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणार आहे. हा चित्रपट कोणता, तर ‘मर्दानी 2’. राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी’ या गाजलेल्या चित्रपटाचा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

राणी मुखर्जीचा पती आणि यशराज बॅनरचा मालक आदित्य चोप्रा ‘मर्दानी 2’ प्रोड्यूस करतोय. गोपी पुथरन हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे. गोपी पुथरन यांनीच या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली आहे. अहान त्यांनाच असिस्ट करणार आहे. एकंदर काय तर, आधी दिग्दर्शनातील बारकावे शिकून नंतर अभिनयात उतरण्याचे अहानचे मनसुबे आहेत. त्याच्या या मनसुब्यांना किती यश येते, ते बघूच.

अहान हा शाहरूख खानची मुलगी सुहाना खान हिचा चांगला मित्र आहे. तूर्तास बॉलिवूड डेब्यूसोबतच आपल्या लव्ह लाईफमुळेही अहान चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी अहान व अभिनेत्री अमायरा दस्तूर यांच्या डेटींगच्या बातम्या अशाच चर्चेत आल्या होत्या. अहान व अमायरा दोघेही पार्टी करायचे, एकमेकांसोबत फिरायचे, सोबत स्नूकर खेळायचे, रात्र-रात्र एकमेकांशी बोलायचे. पण आता अहानच्या आयुष्यात ‘मिस वर्ल्ड’च्या मुकूटावर नाव कोरणारी मानुषी छिल्लर हिने एन्ट्री घेतल्याची चर्चा आहे.

Web Title: Ahaan Panday to make his Bollywood debut with Rani Mukerji's Mardaani 2?