अनन्या पांडेचा भाऊ अहानच्या 'सैय्यारा' सिनेमाचा ट्रेलर, 'नेपोकिड'चा अभिनय पाहून प्रेक्षक म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 16:48 IST2025-07-08T16:47:44+5:302025-07-08T16:48:23+5:30
अहान पांडेचा अभिनय कसा वाटला? प्रेक्षक म्हणाले...

अनन्या पांडेचा भाऊ अहानच्या 'सैय्यारा' सिनेमाचा ट्रेलर, 'नेपोकिड'चा अभिनय पाहून प्रेक्षक म्हणाले...
अनन्या पांडेचा चुलत भाऊ अहान पांडे (Ahaan Panday) बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. त्याच्या 'सैय्यारा' सिनेमाचा ट्रेलर आज समोर आला आहे. यामध्ये तो अभिनेत्री अनीत पड्डासोबत रोमान्स करताना दिसत आहे. अहान चंकी पांडेचा पुतण्या आहे. फिल्मी बॅकग्राऊंडमधून असूनही त्याला पदार्पणासाठी संघर्ष करावा लागला. त्याच्या सिनेमाचा ट्रेलर पाहून नेटकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिली वाचा.
'सैय्यारा' ही एक कॉलेज लव्हस्टोरी आहे. 'आशिकी'चाच फील देणारा हा सिनेमा आहे. सिनेमा अहान क्रिश या आर्टिस्टच्या भूमिकेत आहे. तर अभिनेत्री अनीत पड्डा वाणीची भूमिका साकारत आहे. दोघंही सिंगर असतात. क्रिशला सिंगर म्हणून जगभरात लोकप्रिय व्हायची इच्छा असते. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडतात. मात्र काही कारणाने त्यांच्यात दुरावा येतो. त्यांच्या प्रेमाची आणि विरहाची ही कहाणी आहे. डायलॉग्स, गाणी लक्ष वेधून घेत आहेत.
ट्रेलर पाहून सर्वांनीच अहानचं कौतुक केलं आहे. तसंच दोघांची केमिस्ट्रीही प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. बऱ्याच दिवसांनी बॉलिवूडमध्ये इतकं परफेक्ट कास्टिंग आणि अशी लव्हस्टोरी आल्याने चाहते आतुर आहेत. 'अहान नेपोकिड असला तरी त्याची मेहनत स्पष्ट दिसून येत आहे', 'अनन्या पांडेच्या भावाला बघून वाटतंय की तो नेपोकिड म्हणून नाही तर स्वत:च्या जिद्दीने इथपर्यंत पोहोचला आहे','अहानला अभिनय जमतो असं दिसतंय' अशा कमेंट्स आल्या आहेत.
'सैय्यारा' १८ जुलै रोजी रिलीज होत आहे. 'आशिकी २' फेम मोहित सुरी यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तर अक्षय वाधवानी यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे.