‘मिस वर्ल्ड’मानुषी छिल्लर विशीतल्या ‘या’ तरूणाच्या प्रेमात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 21:47 IST2018-08-30T21:45:17+5:302018-08-30T21:47:59+5:30

 काल-परवा मानुषीने तिचा ‘नो मेकअप’ लूक शेअर केला. तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरलही झाला. तूर्तास मानुषीबद्दल एक वेगळीच बातमी कानावर येतेय

Ahaan Panday and Manushi Chillar are the new friends in B-Town | ‘मिस वर्ल्ड’मानुषी छिल्लर विशीतल्या ‘या’ तरूणाच्या प्रेमात?

‘मिस वर्ल्ड’मानुषी छिल्लर विशीतल्या ‘या’ तरूणाच्या प्रेमात?

‘मिस वर्ल्ड’च्या मुकूटावर नाव कोरणारी मानुषी छिल्लर हॉट फोटोंमुळे कायम चर्चे असते. काल-परवा मानुषीने तिचा ‘नो मेकअप’ लूक शेअर केला. तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरलही झाला. तूर्तास मानुषीबद्दल एक वेगळीच बातमी कानावर येतेय. ही बातमी ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. होय, सध्या मानुषीची एका तरूणासोबतच चांगलीच जवळीक वाढत असल्याचे कळतेय. हे ऐकून लाखो तरूणांचा हृदयभंग होऊ शकतो. पण हे खरे आहे. मानुषीला भावलेला हा तरूण दुसरा कुणी नसून चंकी पांडेचा पुतण्या अहान पांडे आहे.

 होय, मानुषी आणि अहानच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी सध्या जोर धरला आहे. गेल्या काही दिवसांत दोघांनाही अनेकदा एकत्र पाहिले गेले. गत १४ मे रोजी मानुषीने तिचा वाढदिवस साजरा केला. यावेळी अहानने तिला एक अंगठी गिफ्ट केल्याचेही कळतेय.
अहान हा शाहरूख खानची मुलगी सुहाना खान हिचा चांगला मित्र आहे. लवकरच अहानही बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याच्या तयारीत आहे. काही दिवसांपूर्वी अहान व अभिनेत्री अमायरा दस्तूर यांच्या डेटींगच्या बातम्या अशाच चर्चेत आल्या होत्या. अहान व अमायरा दोघेही पार्टी करायचे, एकमेकांसोबत फिरायचे, सोबत स्नूकर खेळायचे, रात्र-रात्र एकमेकांशी बोलायचे. पण आता अहानच्या आयुष्यात मानुषीने एन्ट्री घेतलीयं. मानुषीचे म्हणाल तर यापूर्वी मानुषी ‘मिस्टर इंडिया’ राहिलेला रोहित खंडेलवालला डेट करत होती, रोहितने मिस्टर वर्ल्ड किताबही जिंकला आहे. रोहितनेच मानुषीला मिस वर्ल्डसाठी तयार केले होते.

Web Title: Ahaan Panday and Manushi Chillar are the new friends in B-Town