वयाच्या 60 व्या वर्षी देखील नीना गुप्ता देतात असा सल्ला, आजही 'त्या' गोष्टीचा त्यांना पश्चाताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 06:00 IST2020-03-05T06:00:00+5:302020-03-05T06:00:00+5:30

नीना गुप्ता यांचे लाखोंनी चाहते आहेत. त्यांच्या वैयक्तीक आणि वैवाहिक जीवनाविषयी जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता असते.

At the Age Of 60 Neena Gupta Says don't get involved with a Married Man-SRJ | वयाच्या 60 व्या वर्षी देखील नीना गुप्ता देतात असा सल्ला, आजही 'त्या' गोष्टीचा त्यांना पश्चाताप

वयाच्या 60 व्या वर्षी देखील नीना गुप्ता देतात असा सल्ला, आजही 'त्या' गोष्टीचा त्यांना पश्चाताप

बॉलिवूडमध्ये ब्रेकअप आणि पॅचअप या गोष्टी रोज घडत असतात. कोणाचे तरी अफेअर सुरु होते तर कुणाचं तरी नातं संपत. मात्र हा ट्रेंड बॉलिवूडमध्ये पूर्वापार चालत आलेला आहे.नीना गुप्ता यांचे लाखोंनी चाहते आहेत. त्यांच्या वैयक्तीक आणि वैवाहिक जीवनाविषयी जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता असते. आजपर्यंत त्यांच्या खासगी जीवनाबाबत अनेक धक्कादायक खुलासे जगासमोर आले आहेत. 


8० च्या दशकात त्यांनी घेतलेल्या एका निर्णयाची प्रचंड चर्चा झाली. यासाठी त्यांना पराकोटीच्या टीकेला सामोरे जावे लागले. पण स्वतंत्र विचारांच्या नीना जगाची पर्वा न करता आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. हा निर्णय होता, वेस्ट इंडियाचा माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्ससोबत लग्न न करता त्याच्या मुलीला जन्म देण्याचा. 8० च्या दशकात हा निर्णय मुळातचं क्रांतिकारी निर्णय होता. मसाबा ही त्यांची मुलगी आहे. नीना गुप्ता यांनी विवाहीत पुरूषाच्या प्रेमात पडल्या आणि तिथेच चुक केली असल्याचे म्हटले आहे. प्रेम करा पण विवाहीत पुरूषाच्या प्रेमात पडू नका असा सल्ला त्यांनी दिला आहे. त्यांनी स्वत:च उदाहरण देत असं न करण्याचा सल्ला त्यांच्या इन्स्टाग्राम फ्रेंड्सना दिला आहे. त्यांनी हा व्हिडीओ शेअर करत त्याला 'सच कहुँ तो' असं कॅप्शन दिलं आहे. त्यांनी हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर अनेकांनी त्यांच्या हिंमतीचं कौतुक केलं आहे.


नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा गुप्ता हिने अखेर पती मधु मंटेनासोबत घटस्फोट घेतला आहे. मसाबाने २०१५ मध्ये मधु मंटेनासोबत लग्न केले होते. मधु मंटेना फँटम फिल्म्सचा को-फाउंडर आहेत. त्याने 'गजनी', 'रण', 'रक्त चरित्र', 'झुठा ही सही', 'मौसम' या सिनेमांची निर्मिती केली आहे. मसाबाचे म्हणाल तर ती बॉलिवूडची एक यशस्वी फॅशन डिझाईनर आहे.

Web Title: At the Age Of 60 Neena Gupta Says don't get involved with a Married Man-SRJ