‘अल्लाह’ मला माझ्या प्रवासात मदत करेन...! अभिनेत्री सना खानचा बॉलिवूड संन्यास 

By रूपाली मुधोळकर | Updated: October 9, 2020 11:40 IST2020-10-09T11:20:05+5:302020-10-09T11:40:12+5:30

झायरा वसीम पाठोपाठ सना खानने धर्मासाठी सोडले बॉलिवूड

after zaira wasim sana khan also quit showbiz lifestyle to serve humanity and religion | ‘अल्लाह’ मला माझ्या प्रवासात मदत करेन...! अभिनेत्री सना खानचा बॉलिवूड संन्यास 

‘अल्लाह’ मला माझ्या प्रवासात मदत करेन...! अभिनेत्री सना खानचा बॉलिवूड संन्यास 

अल्लाह के रास्ते से भटक गई थी... असे म्हणत बॉलिवूड अभिनेत्री झायरा वसीमने बॉलिवूड सोडले होते. आता बॉलिवूडच्या आणखी एका अभिनेत्रीने ‘अल्लाह’साठी ग्लॅमर इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तिचे नाव म्हणजे सना खान. होय, ‘बिग बॉस 6’ आणि सलमान खानच्या ‘जय हो’ सिनेमात दिसलेली तीच ती चुलबुली सना खान.
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सनाने बॉलिवूडमधून संन्यास घेत असल्याची घोषणा केली आहे. अल्लाह माझ्या या नव्या प्रवासात मला मदत करेल... मी अल्लाहच्या आदेशांचे पालन करेल, असे सनाने या पोस्टमध्ये लिहिले आहे.


 
पोस्टमध्ये ती म्हणते...
सना खानने रोमन, इंग्रजी व अरबी अशा तीन भाषांमध्ये पोस्ट शेअर केली आहे. ती लिहिते, ‘आज मी आयुष्याच्या एका महत्त्वाच्या वळवणार पोहोचली आहे. मी अनेक वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीत आहे. या काळात मला पैसा, प्रतिष्ठा, प्रेम सगळे काही मिळाले. चाहत्यांकडून मिळालेल्या या सर्वगोष्टींसाठी मी त्यांची आभारी आहे. पण काही दिवसांपासून एक वेगळाच प्रश्न पडला होता. पैसा, प्रसिद्धी मिळवणे हेच जगात येण्याचे उद्दिष्ट आहे का?  जे  निराधार, अनाथ आहेत अशांसाठी आपले काहीच कर्तव्य नाही का? मृत्यू कधीही गाठू शकतो आणि मेल्यानंतर आपले काय; हा विचार आपण करायला नको? या प्रश्नांची उत्तरं मी शोधतेय.  विशेषत:  मरणानंतर माझे काय होईल? या प्रश्नाचे उत्तर मी शोधते आहे.
 त्यामुळे आज मी घोषणा करते की, आजपासून मी बॉलिवूड इंडस्ट्रीतील आयुष्य सोडून मानवता आणि अल्लाहच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेते आहे. माझ्या सर्व बहिण-भावांना विनंती करते की, यापुढे इंडस्ट्रीतील कोणत्याही गोष्टीसाठी मला निमंत्रण देऊ नये. खूप खूप आभार.


 
कोण आहे सना खान?
सना खान ही अभिनेत्री बिग बॉस 6 दरम्यान चर्चेत आली होती. 2005 मध्ये ‘यही है हाय सोसायटी’ या चित्रपटातून तिने अभिनयाची कारकिर्द सुरु केली होती. यानंतर हिंदी, मल्याळम, तामिळ, तेलगू, कन्नड अशा भाषेतील अनेक सिनेमे तिने केलेत. बिग बॉस आणि फिअर फॅक्टर या रिअ‍ॅलिटी शोमध्ये सुद्धा ती झळकली होती.

झाले होते ब्रेकअप

याच वर्षाच्या सुरुवातीला सना खानचे बॉयफ्रेन्ड मेलविन लुईससोबत ब्रेकअप झाले होते. यावेळी तिने मेलविन लुईसवर अनेक आरोप केले होते. त्याच्या बद्दल तिने सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर केल्या होत्या. आता या सर्व जुन्या पोस्ट तिने तिच्या अकाऊंटवरून डिलीट केल्या आहेत. आता पुन्हा एकदा अभियन क्षेत्र सोडण्याच्या निर्णयामुळे चर्चेत आली आहे.

मी तोंड उघडले तर...! एक्स-बॉयफ्रेन्डच्या आरोपांवर सना खानचे उत्तर

-आणि स्टेजवर ढसाढसा रडली प्रेमभंग झालेली ही अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल

झायरानेही घेतला होता संन्यास

2019 मध्ये अभिनेत्री झायरा वसीम हिने धर्मासाठी बॉलिवूडमधून संन्यास घेतला होता.‘अल्लाह के रास्ते से भटक गई थी...’, असे सांगत झायराने आपला हा निर्णय चाहत्यांशी शेअर केला होता. ‘पाच वर्षांपूर्वी मी बॉलिवूडमध्ये येण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाने माझे आयुष्य बदलले होते. माझा हा प्रवास प्रचंड थकवणारा होता. या पाच वर्षांत मी स्वत:शीच झगडले. पण इतक्या लहान वयात मी इतका मोठा संघर्ष करू शकत नाही. त्यामुळे मी बॉलिवूडशी नाते तोडते आहे. मी अतिशय विचारपूर्र्वक हा निर्णय घेतला आहे...’, असे झायराने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले होते.

Web Title: after zaira wasim sana khan also quit showbiz lifestyle to serve humanity and religion