‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’नंतर ‘हा’ आहे आमिर खानचा प्लान?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2018 12:20 IST2018-08-19T12:19:37+5:302018-08-19T12:20:29+5:30

‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ रिलीज होण्याआधीच आमिरचा पुढचा चित्रपट कोणता असेल, याचीही चर्चा सुरू झाली आहे. 

after thugs of hindostan aamir khan to feature in a remake of a hollywood film | ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’नंतर ‘हा’ आहे आमिर खानचा प्लान?

‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’नंतर ‘हा’ आहे आमिर खानचा प्लान?

येत्या दिवाळीला आमिर खानचा ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ प्रदर्शित होतोय. साहजिकचं आमिरचे चाहते या चित्रपटाकडे डोळे लावून बसले आहेत. पण ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ रिलीज होण्याआधीच आमिरचा पुढचा चित्रपट कोणता असेल, याचीही चर्चा सुरू झाली आहे. चर्चा खरी मानाल तर, ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’नंतर आमिर एका हॉलिवूडच्या रिमेकमध्ये काम करू शकतो. याबाबतीत अधिक तपशील मिळू शकला नाही. पण पॅरामाऊंट प्रॉडक्शनच्या बॅनरखाली हा चित्रपट बनणार आहे. हा हॉलिवूड चित्रपट कोणता, हेही अद्याप गुलदस्त्यात आहे. सूत्रांच्या मते, तुर्तास या हॉलिवूड चित्रपटाचे हक्क मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेही सगळे काही नक्की झाल्याशिवाय आमिर कुठल्याही चित्रपटाची घोषणा करत नाही. त्यामुळे सगळे काही फायनल होण्याची प्रतीक्षा आपल्याला करावी लागेलचं.
सध्या आमिर भूषण कुमारसोबत मिळून गुलशन कुमारचे बायोपिक प्रोड्यूस करतो आहे. पण या चित्रपटात आमिर खान नसणार. मध्यंतरी आमिर आध्यात्मिक गुरु ओशो यांच्या बायोपिकमध्ये दिसणार अशी बातमी होती. पण तूर्तास हा चित्रपट रोखण्यात आला आहे. आमिरची टीम या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर नव्याने काम करते आहे. स्क्रिप्टमधील काही भाग आमिरला आवडले नसल्याचे कळतेय.

आमिरचा ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. यात आमिरसह अमिताभ बच्चन, कॅटरिना कैफ, फातिमा सना शेख यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Web Title: after thugs of hindostan aamir khan to feature in a remake of a hollywood film