लॉकडाउननंतर आलिया भटच्या 'गंगुबाई काठियावाडी'मुळे बॉलिवूडला आले अच्छे दिन!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 04:32 PM2022-05-02T16:32:57+5:302022-05-02T16:33:37+5:30

Alia Bhatt : मोठ्या पडद्यावर धमाका केल्यानंतर, आता आलिया भटचा 'गंगुबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) चित्रपट काही दिवसांपूर्वीच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आणि आता ट्रेंडिंगमध्ये नंबर वनवर आहे.

After the lockdown, Alia Bhatt's 'Gangubai Kathiawadi' brought good days to Bollywood! | लॉकडाउननंतर आलिया भटच्या 'गंगुबाई काठियावाडी'मुळे बॉलिवूडला आले अच्छे दिन!

लॉकडाउननंतर आलिया भटच्या 'गंगुबाई काठियावाडी'मुळे बॉलिवूडला आले अच्छे दिन!

googlenewsNext

लॉकडाउननंतर आता बॉलिवूडचे चांगले दिवस परत आले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट(Alia Bhatt)मुळे यशाची सुरूवात झाली, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. लॉकडाउननंतर प्रदर्शित झालेला तिचा 'गंगुबाई काठियावाडी' (GangubaiKathiawadi) हा एकमेव सुपरहिट स्त्री केंद्रित चित्रपट आहे. हा चित्रपट बॉलिवूडसाठी सर्वात मोठा नॉन हॉलिडे ओपनिंग चित्रपट ठरला.
  
मोठ्या पडद्यावर धमाका केल्यानंतर, आता हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता आणि आता ट्रेंडिंगमध्ये नंबर वनवर आहे.  त्यामुळे आलियाच्या चाहत्यांची तिच्यासाठी असलेली क्रेझ पाहायला मिळत आहे. या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी आलियाचे सर्वत्र कौतुक होत आहे.  चित्रपटसृष्टीपासून, चित्रपट समीक्षक आणि प्रेक्षकही तिची प्रशंसा करताना दिसून येत आहेत.  तसेच हा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट स्त्री केंद्रित चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे.


आलियासाठी हे नवीन वर्ष करिअरच्या दृष्टीने खास ठरत आहे. कारण, गंगुबाईनंतर आता आलिया चक्क हॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरुन आलियाच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली होती. त्यांच्या पोस्टनुसार, आलिया Heart of Stone या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. Heart of Stone हा स्पाय थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात आलियासोबत गॅल गॅडोट (Gal Gadot) आणि Jamie Dornan हे स्क्रीन शेअर करणार आहेत. तसेच टॉम हार्पर या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत.

 

Web Title: After the lockdown, Alia Bhatt's 'Gangubai Kathiawadi' brought good days to Bollywood!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.